पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Australian Open : फेडररविरुद्ध विजयी चौकारासह जोकोविचनं गाठली फायनल

जोकोविच आणि फेडरर

स्विस टेनिस स्टार रॉजर फेडररला एकहाती पराभूत करत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. रॉड लवेर एरिनाच्या कोर्टवर २ तास १८ मिनिटे रंगलेल्या लढतीमध्ये जोकोविचने फेडररला  ७-६, ६-४, ६-३ असे पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला. जोकोविच आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पोहचला आहे.

वनडेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, तिकडीची दुखापत डोकेदुखी वाढविणार?

ऑस्ट्रेलियन ओपनमधील पुरुष एकेरीतील जोकोविच पहिला फायनलिस्ट आहे. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि डॉमिनिक थीम यांच्यात लढत होणार असून यांच्यातील विजेत्याविरुद्ध रविवारी जोकोविच फायनलमध्ये लढताना दिसेल. आपल्या १७ व्या ग्रँडस्लॅमसाठी कोर्टवर उतरलेल्या जोकोविचला पहिल्या सेटमध्ये रॉजर फेडररने पिछाडीवर टाकले होते.

Video : आकाशला कोना मारणाऱ्या सॅमला आयसीसीचा दणका

मात्र दमदार खेळ करत जोकोविचने सामन्यावर पकड मिळवली. टायब्रेकरमध्ये त्याने सेट आपल्या नावे केला.  पहिला सेट गमावल्यानंतर फेडररला मेडिकल टाइम आउट घ्यावा लागला. सलग दुसऱ्या सामन्यात फेडररने  मेडिकल टाइम आउट घेतल्याचे पाहायला मिळाले.  जोकोविचनं सेमीफायनलमध्ये फेडररला पराभूत करण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी २००८, २०११ आणि २०१६ मध्ये जोकोविचनं फेडररला थांबले होते.