पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिन विराट नव्हे दीपिकाला आवडतो हा क्रिकेटर

दीपिका पादुकोन

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन तिच्या आगामी छपाक या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वडील प्रकाश पादुकोन यांच्यामुळे कधीकाळी बॅडमिंटनमध्ये हात आजमावलेल्या दीपिकाला क्रिकेटमध्ये अधिक रुची असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यापूर्वी स्टार स्पोर्टस्च्या प्री-शोमध्ये दीपिकाने हजेरी लावली होती. यावेळी तिने आपल्या आवडत्या क्रिकेटरचे नाव सांगितले. 

युवीच्या आयुष्यातील या दोन गोष्टी तुम्ही ऐकल्यात का?

दीपिका म्हणाली की, राहुल द्रविड तिचा ऑल टाइम फेव्हरेट क्रिकेटर आहे. यावेळी तिने राहुल द्रविड आवडण्यामागचे कारणही सांगितले. क्रिकेटच्या मैदानात कोण किती चांगल्यापद्धतीने कामगिरी बजावतो त्यापेक्षा मैदानाबाहेर एखाद्या खेळाडूचे वर्तन कसे आहे यावरुन मी आवडत्या खेळाडूची निवड केली आहे. राहुल द्रविड बंगळुरुचा आहे आणि तो मला एक आदर्श खेळाडू वाटतो, असे दीपिका म्हणाली. 

INDvsWI: धोनी कमबॅक पंतविरोधात सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

आयुष्यात खेळाला महत्त्व द्यायला हवे. आपण शारिरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर कणखर होण्यासाठी खेळ उपयुक्त असल्याचेही दीपिकाने यावेळी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वीच एका कार्यक्रमामध्ये दिपिकाला रणवीर तुझ्यासोबत बॅडमिंटन खेळतो का? असा प्रश्न विचारला होता. यावर दीपिकाने गंमतीशीर उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले होते. तो माझ्यासोबत बॅडमिंटन खेळतो. मी स्कोअर देखील शेअर केला असता पण त्याला राग येईल, असे दीपिकाने सांगितले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:no virat kohli no sachin tendulkar Deepika Padukone Reveals Rahul Dravid is Her All-Time Favourite Cricketer