पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाक पुन्हा तोंडावर आपटले, लंकेच्या मंत्र्यांनी दिला दहशतवादाचा दाखला

श्रीलंकेच्या प्रमुख खेळाडूंनी पाकमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून भारत-पाक संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण झाले आहेत. काश्मीरसंदर्भातील निर्णयानंतर वेगवेगळी कारण शोधून पाकिस्तान भारतावर बिन बुडाचे आरोप करत आहे. निरर्थक आरोपामुळे पाकची अनेकदा फजितीही झाली. पण त्यांच्यात सुधारणा होण्याची चिन्हे काही दिसत नाही. पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार देणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंनी भारताच्या दबाबात आपली भूमिका मांडली आहे, अशी कुरघोडी करण्याचा पाकने प्रयत्न केला. मात्र या आरोपानंतरही पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहे.

'भारताच्या दबावामुळेच श्रीलंकन खेळाडू पाकमध्ये खेळण्यास तयार नाहीत'

भारताच्या दबावामुळे श्रीलंकेच्या प्रमुख खेळाडूंनी पाक दौऱ्यातून माघार घेतली, असा आरोप पाकिस्तान सरकारमधील एका विद्यमान मंत्र्यांनी केला होता. पाकिस्तानच्या मैदानात उतरल्यास आयपीएलमधील करार रद्द करु, अशी धमकी भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंना दिली आहे, असे ट्विट करत पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी भारतावर आरोप केला होता.  श्रीलंकेचे केंद्रीय क्रीडा मंत्री हॅरिन फर्नांडो यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

श्रीलंकेच्या १० खेळाडूंनी दिला पाकला दणका! दौऱ्यातून घेतली माघार

२००९ मध्ये पाक दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकन खेळाडूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करुन त्यांनी भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंवर दबाव टाकल्याचा दावा खोडून काढला. हॅरिन फर्नांडो यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, पाक दौऱ्यापासून दूर रहाण्यासाठी श्रीलंकन खेळाडूंवर भारताने दबाव आणल्याच्या दाव्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. २००९ मध्ये श्रीलंकन संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्यांच्या भूमिकेचा आम्ही आदर करतो. जे खेळाडू पाक दौऱ्यात सहभागी होण्यासाठी राजी आहेत त्यांच्यासह श्रीलंकन संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी सज्ज आहे. प्रमुख खेळाडूंशिवाय पाकिस्तान दौऱ्यासाठी निवडलेला संघ क्षमतेने भरलेला असेल. हा संघ पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानला नमवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: No truth Sri Lanka rejects Pakistan ministers claims of Indias role in SL cricketers pulling out of upcoming tour