पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'एकता कपूर यांना पद्मश्री मिळतो मग दिवंगत वडिलांना हा सन्मान का नाही?'

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून खाशाबा जाधव यांना पद्मश्रीचा पुरस्कार मिळालेला नाही.

ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून देणाऱ्या दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांनी आपल्या वडिलांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी मागणी केली आहे. प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करणाऱ्या खाशाबा जाधव यांचे १९८४ मध्ये निधन झाले.  

Australian Open : फेडररला शह देत जोकोविचनं गाठली फायनल  

पीटीआयच्या वृत्तानुसार, एकता कपूर यांना पद्मश्री मिळाल्याचा दाखला देत रणजीत जाधव यांनी वडिलांना पद्मश्री पुरस्कार न मिळाल्याची खंत व्यक्त केली. रणजित म्हणाले की, वडिलांनी हेलसिंकी, १९५२ मध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. चित्रपटसृष्टीतील एकता कपूर यांना पद्मश्री मिळाला पण देशासाठी वैयक्तिक पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देखील त्यांना आतापर्यंत पद्मश्री देखील मिळाला नसल्याची खंत वाटते. तब्बल १७ वर्षानंतर त्यांना मरणोत्तर अर्जून पुरस्कार देण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले.  

वनडेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, तिकडीची दुखापत डोकेदुखी वाढविणार?

रणजित जाधव पुढे म्हणाले की, मागील १९ वर्षांपासून वडिलांना सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा, यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करत आहे. किमान त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने तरी गौरव व्हावा, अशी इच्छा आहे. वडिलांनी ऑलिम्पिक पदक मिळवल्यानंतर १९५४ ते १९८४ दरम्यान अनेक खेळाडूंना पद्मश्री तर काहींना पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही पुरस्कार मिळाले. यात हॉकीचे जादूगार ध्यानचंद आणि काही मोजके खेळाडू सोडले तर अन्य कोणीही ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेली नाही, असा दावाही रणजित जाधव यांनी केला. एकता कपूर यांना पद्मश्रीने गौरवण्यात आले. त्याचा सामाजिक अर्थ काय? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.