पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे घातलेल्या निर्बंधांमुळे परदेशी खेळाडू १५ एप्रिलपर्यंत IPL ला मुकणार?

आयपीएलवर कोरोनाचं सावट

करोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे सरकारनं भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आयपीएलसाठी १५ एप्रिलपर्यंत कोणतेही परदेशी खेळाडू उपलब्ध होणार नाहीत असं  बीसीसीआयच्या सुत्रांनी  म्हटलं आहे.

कोरोनाचे सावट आयपीएल स्पर्धांवरही आहे, आयपीएल स्पर्धेला सरकारने हिरवा कंदिल दिला आहे. पण स्पर्धा ही प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात यावी, अशी अट राज्य सरकारने घातली आहे. आयपीएल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता ही स्पर्धा रद्द करावी, अशी मागणी जोर धरत होती. मात्र प्रेक्षकांविनाच स्पर्धा भरवण्यात याव्यात अशी अट ठेवण्यात आली होती. 

काळजी नको, कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय

मात्र कोरोनाचा फैलाव भारतात रोखण्यापासून भारत सरकारने अनेक देशातील नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. १५ एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांचा व्हिसा रद्द करण्यात आला असून भारताचे दरवाजे त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत. १३ मार्चला मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याची खबरदारी म्हणून केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. डिप्लोमेटिक, कार्यालयीन व्हिसा, आंतरराष्ट्रीय संघटना  याव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.  

कोरोनाची लक्षणे आढळल्यास काय करावे?

आता केंद्र सरकारने परदेशी नागरिकांच्या व्हिसा देण्यावर निर्बंध घातल्यानं आयपीएलमध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या भारतात येण्यावर निर्बंध आले आहेत. सरकारच्या नव्या आदेशानुसार ते १५ एप्रिलपर्यंत भारतात येऊ शकत नाहीत, असे बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. आयपीएलचा १३वा हंगाम येत्या २९ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र १४ मार्च रोजी आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलची बैठक होणार आहे या बैठकीत आयपीएल संदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

कोरोनाबाधितांची नावे उघड केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार