पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI: विराटला बाद केल्यावर विल्यम्सनं केलेला इशारा तुम्हा कळला का?

कोहली आणि विल्यम्स

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विंडीजचा जलदगती गोलंदाज केसरिक विल्यम्स यांच्यात मैदानावर एक खुन्नस पाहायला मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात विल्सम्स कोहलीवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात  विल्सम्सने भारतीय कर्णधाराला लेंडल सिमन्सकरवी अवघ्या १९ धावांवर झेलबाद केले. मात्र यावेळी त्याने सेलिब्रेशन करु नका, असे आपल्या सहकाऱ्यांना इशाऱ्या द्वारे सांगत कोहलीला शांतपणे तंबूत धाडले.  

INDvsWI T20I : बढती मिळालेल्या शिवमनं विंडीज गोलंदाजांना चांगलच धोपटलं

हैदराबादच्या मैदानात कोहलीने दोनवर्षांपूर्वी विल्यम्सने जमेकाच्या मैदानात केलेली सेलिब्रेशन स्टाईल करुन दाखवली होती. कोहलीचे हे तेवर सोशल मीडियावर ज्याप्रमाणे व्हायरल झाले. त्याच प्रकारे आजचा किस्साही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. नेटकरी आपपल्या अंदाजात यावर व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. 

Video : आदर राखून कोहलीनं पुरा केला हिशोबाचा फेरा

एका नेटकऱ्याने लिहलंय की, कोहली-विल्यम्स यांच्यातील लढाई पाहण्याजोगी आहे. पहिल्या सामन्यात विराट भारी ठरल्यानंतर आता विल्यम्सनने त्याची बरोबरी केली आहे. मुंबईमध्ये दोघांमध्ये कोण सरस ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. याशिवाय आणखी काही मजेशीर मिम्स देखील व्हायरल होताना दिसत आहेत.