पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : गडकरी-फडणवीसांच्या गोलंदाजीवर पांड्याची फटकेबाजी

गडकरी आणि हार्दिक पांड्या

केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी राजकीय भाष्य करताना क्रिकेटचा दाखला देताना आपण पाहिले आहे. राजकारण हे क्रिकेटप्रमाणे असते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला काहीच सांगता येत नाही, असे वक्तव्य त्यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावेळी केले होते. राजकीय मैदानात फटकेबाजी करणाऱ्या  गडकरींच्या गोलंदाजीवर पांड्याने फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. गडकरी यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हार्दिक पांड्याला गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले.  

सेरेनाचा खेळ खल्लास! शतकी विजयासाठी फेडररलाही करावा लागला संघर्ष

नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तिसऱ्या पर्वाच्या सांगता समारोहाला भारताचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. १५ दिवसांपासून सुरु  असलेल्या या कार्यक्रमाचा शुक्रवारी समारोप झाला. या महोत्सवाबद्दल नितीन गडकरी म्हणाले की, ४२ हजार खेळाडूंनी यात भाग घेतला होता. वेगवेगळ्या ११५ मैदानात ३२ खेळ प्रकार समाविष्ट करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करताना हार्दिक पांड्या व्यासपीठावर उपस्थित होता. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हार्दिक पांड्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. 

NZvsIND : राहुल-विराटनं पाया रचला अन् श्रेयसने विजयाचा कळस चढवला!

या महोत्सवापूर्वी नितीन गडकरी यांनी नागपूरमधील मैदानांची पाहणी केली होती. एवढेच नाही तर छत्रपती नगरच्या मैदानात त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतल्याचीही चांगलीच चर्चा रंगली होती. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष पार पडले. स्पर्धेतील विजेत्यांसह यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांना मार्गदर्शन देणाऱ्या प्रशिक्षकांना देखील सन्मानित करण्यात आले.