पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कांगारुंना पुन्हा धक्का! आणखी एकाने तणावामुळे घेतली माघार

पाक विरुद्धच्या मालिकेपूर्वी निकने माघार घेतली आहे.

ऑस्ट्रेलियन संघातील अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने मानसिक अस्वस्थाच्या कारणामुळे क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. ऑस्ट्रेलियन संघ यातून बाहेर पडत नाही तोवर आणखी एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने तणावाच्या कारणास्तवर संघातून आपले नाव काढून घेतल्याचे समोर येत आहे. 

INDvBAN: वादळ घोंगावलं, पण रोहितचं! भारताची मालिकेत बरोबरी

११ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया अ आणि पाकिस्तान यांच्यात तीन दिवसीय सराव सामना होणार आहे. यासाठी ऑस्ट्रेलियन ताफ्यात निवड झालेल्या निक मेडिसनने शनिवारी माघार घेतली आहे. मानसिक तणावामुळेच त्याने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी कॅमेरून बेनक्रॉफ्टला संधी देण्यात आली आहे. 

किंग कोहलीला जमलं नाही ते स्मृतीनं करुन दाखवलं

ऑस्ट्रेलिया-अ संघाचे प्रशिक्षक ग्रीम हिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकने अगदी योग्य निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व त्याच्या पाठिशी आहोत. मनामध्ये खचत राहण्यापेक्षा असा निर्णय घेतलेला कधीही योग्य आहे. खेळापेक्षा निकने मानसिक आरोग्यास प्राधान्य देण्याचा निर्णय कौतुकास्पद असून तो सावरुन पुन्हा ताफ्यात सहभागी व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.