पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेयमारनं 'सोशल डिस्टन्सिंग'चं उल्लंघन केलेल नाही, टीमकडून स्पष्टीकरण

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेयमार

कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे जगातील सर्व खेळाची मैदाने ओस पडली आहेत. दरम्यान ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू मित्रांसोबत फुटबॉल खेळून सोशल डिस्टन्सिंग नियमाची पायमल्ली केल्याचे वृत्त समोर आले होते. नेयमारने हे वृत्त फेटाळून लावले आहे. मित्रांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेयमारला ट्रोल करण्यात आले होते. जगात संकट घोंगावत असताना फुटबॉला आनंद घेणे अशोभनिय कृत्य आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेयमारने शेअर केलेल्या फोटोवर उमटल्या होत्या. 

 

इंग्लंडमध्ये कोरोनाने घेतला क्रिकेट क्लबच्या अध्यक्षांचा बळी

नेयमारच्या व्यवस्थापकीय टीमने यासंदर्भात एक परिपत्रक काढून नेयमारची बाजू मांडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या फोटोची चर्चा सुरु झाली आहे. त्या फोटोतील सर्व नेयमारसोबत क्वॉरंटाईनमध्ये होते. त्यांनी नेयमारसोबत पॅरिस ते ब्राझील असा प्रवास केला होता. एवढेच नाही तर नेयमारने या सर्वांसमोर घरी परतण्यापूर्वी स्वत:च्या घरी १४ दिवस क्वॉरंटाईनचा प्रस्ताव ठेवला होतो, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ही सर्व जण वेगवेगळ्या घरामध्ये क्वॉरंटाईन आहेत. असेही व्यवस्थापकीय टीमने म्हटले आहे.   

लॉकडाऊनः व्होडाफोनकडून ग्राहकांना फ्री टॉकटाइम

पॅरिसस्थित सेंट-जमेर्न क्लबकडून खेळणाऱ्या नेयमारने कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर क्लबकडून  मायदेशी परतण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे जगभरातील अनेक देशात कोरोनामुळे लॉकडाऊनचे संकट ओढावले आहे. मात्र ब्राझील सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण सरकारने लोकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन केले असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचे सूचना नागरिकांना दिल्या आहेत.