भारत आणि न्यूझीलंडमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी रोजी ख्राइस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतील संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. दुखापत झाल्यामुळे इशांत शर्मा शुक्रवारी सराव सत्रात सहभागी झाला नव्हता.
कोरोनामुळे या नेमबाजांसमोर भारतातील 'वर्ल्ड कप'ला मुकण्याची चिंता
इशांत शर्माच्या जागी उमेश यादवला या सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. इशांतला दिल्लीकडून खेळल्या जाणाऱ्या रणजी सामन्या दरम्यान दुखापत झाली होती. इंशात शर्मा या सामान्यात खेळणार नसल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा १० विकेटनी पराभव झाला होता.
...म्हणून IPL प्रशासकीय समितीने या खेळाडूला ठरवले अपात्र
दरम्यान, उमेश यादव हा कसोटी संघाचा एक भाग आहे आणि या सामान्यामध्ये त्याचे खेळणे जवळजवळ निश्चित झाले आहे. या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. तर इशांत शर्माच्या बाहेर पडल्यामुळे किवी संघालाही मोठा फायदा होऊ शकतो.