न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतावर ३१ वर्षांनी व्हाईट वॉश होण्याची वेळ आली. यासोबतच आयसीसीच्या एकदिवसीय रँकिंगमध्ये अव्वलस्थानी असलेल्या जसप्रित बुमराहच्या नावे एका नको अशा विक्रमाची नोंद देखील नोंद झाली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. आतापर्यंतच्या कारकिर्दीत संपूर्ण मालिकेत एकाही गड्याला तंबूत धाडता आले नाही, अशी वेळ त्याच्यावर पहिल्यांदाच आली. मागील सहा सामन्यापैकी पाच सामन्यात त्याला विकेट मिळालेली नाही.
फायनलमधील राडा भोवला! बांगलादेशी खेळाडूंसह भारताच्या दोघांवर कारवाई
न्यूझीलंड विरुद्धच्या हेमिल्टनमध्ये झालेल्या सलामीच्या सामन्यात बुमराहने आपल्या १० षटकांच्या कोट्यात ५३ खर्च केल्या. ऑकलंडमध्ये तो आणखी महागडा ठरला. १० षटकात त्याने ६४ धावा कुटल्या. माउंट मैंगनुईच्या मैदानात रंगलेल्या अखेरच्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने १० षटकात ५० दिल्या. मात्र या तिन्हीही सामन्यात त्याला यश मिळाले नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बंगळुरुमधील सामन्यात त्याने किफायतशीर गोलंदाजी केली. १० षटकात त्याने केवळ ३८ धावाच खर्च केल्या. पण त्याला बळी मिळवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ३२ धावा खर्च करुन त्याने एक बळी मिळवला होता. तर मुंबईच्या वानखेडे मैदानावर ५० धावा खर्च करुन त्याला खाली हात मैदान सोडावे लागले होते.
NZvsIND 3rd ODI: सामन्यातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर
खांद्याच्या दुखापतीमुळे बुमराह बरेच दिवस संघाबाहेर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून त्याने पुन्हा संघात कमबॅक केले. पण त्याला पूर्वीसारखी कामगिरी करण्यात अपयश आले. या दोन दौऱ्याव्यतिरिक्त इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध बुमराहने ३९ धावा खर्च करुन एक बळी टीपला होता. बुमराने आतापर्यंत ६४ सामन्यात १०४ विकेट घेतल्या आहेत. भारतीय संघाच्या यशात जसं बुमराहच्या यशाचं योगदान असते अगदी त्याउलट भारताच्या अपयशाच्या अनेक कारणापैकी एक कारण हे बुमराहच्या पदरी पडलेली निराशा हे देखील आहे.