पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मॅच सुपर ओव्हरमध्ये कशी न्यावी हे न्यूझीलंडकडून शिकावं!

न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये आणखी एक पराभव

सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये नेणार! हा डायलॉग आता न्यूझीलंडसंघासाठी लागू झाला तर नवल वाटणार नाही. तिसऱ्या टी-२० सामन्यात हातात आलेला सामना न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये नेला होता. याची पुनरावृत्ती त्यांनी पुन्हा एकदा केली. अखेरच्या षटकात ७ धावांची आवश्यकता असताना न्यूझीलंडने ४ गडी गमावत सामना बरोबरीत आणला. आणि तो गमावला ही.  

NZ vs IND: सुपर ओव्हरमध्ये टीम इंडिया पुन्हा ठरली सुपर हिट

शार्दुल ठाकूरने पहिल्या चेंडूवर रॉस टेलरला झेलबाद केले. श्रेयस अय्यरने त्याचा झेल टिपला. दुसऱ्या चेंडूवर  डॅरेल मिचेलने चौकार खेचत संघाला विजयासाठी चार चेंडूत तीन धावा अशा परिस्थितीत आणले. शार्दुलच्या तिसऱ्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या नादात न्यूझीलंडने ५७ धावांवर खेळणाऱ्या टिम सेफर्टची विकेट गमावली. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या मिशेल सँटनरने एक धाव घेत सामना २ चेंडूत २ धावा असा आणला. पाचव्या चेंडूवर  डॅरेल मिचेलने शिवम दुबेच्या हाती झेल सोपवला आणि न्यूझीलंड  एका चेंडूत दोन धावा अशा बिकट अवस्थेत पोहचले. शेवटच्या चेंडूवर सँटनर दुसरी धाव घेताना सँटनर बाद होताच सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने सेफर्टची विकेट गमावत १३ धावा केल्या होत्या भारताने लोकेश राहुलच्या विकेटच्या बदल्यात हे आव्हान एक चेंडू राखून पार करत सामना खिशात टाकला. 

...म्हणून क्रिकेट चाहते विराटवर भडकले

यापूर्वी तिसऱ्या आणि 'करो वा मरो' डावातील अखेरच्या षटकात शमीच्या गोलंदाजीमध्ये केन विल्यम्सन ९५ धावांवर बाद झाल्यानंतर सामना भारताच्या बाजूने फिरला होता. न्यूझीलंड सहज जिंकेल असे वाटत असताना हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्याचे पाहायला मिळाला होता. विल्यम्सन आणि गप्टिल यांनी बुमराहच्या षटकात १७ धावा कुटल्या होत्या. भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी संयमी सुरुवात केली. टिम साऊदीच्या अखेरच्या दोन चेंडूत षटकार खेचर रोहित शर्माने भारताच्या विजयासह मालिका खिशात घातली होती. सुपर ओव्हरपर्यंत रंगतदार झालेला न्यूझीलंडसाठीचा हा सातवा सामना असून सहाव्यांदा त्यांच्यावर पराभूत होण्याची नामुष्की ओढावली आहे. २०१० मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय नोंदवला होता. यावेळी साऊथीने केवळ ६ धावा खर्च केल्या होत्या.