पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रहाणेचा सवंगड्यांना कोहलीपेक्षा वेगळा सल्ला

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी मालिकेत दमदार खेळी करुन मालिकेत बरोबरी साधण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर आहे. २९ फेब्रुवारीपासून क्राइस्टचर्चच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी आपापल्या स्वभावानुसार, भारतीय सवंगड्यांना सल्ला दिला आहे. 

टीम इंडियाचा 'गेम प्लॅन' समजण्यापलिकडचा : कपिल देव

प्रबळ इच्छाशक्ती आणि कणखर मानसिकता ठेवून मैदानात उतरण्याची गरज आहे, असे अजिंक्य रहाणेने म्हटले आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी अजिंक्य रहाणे म्हणाला की, आम्ही अधिक आक्रमक  खेळायला हवे, असे वाटत नाही. संयमी खेळीसह मैदानात तग धरुन थांबण्याची मानसिकता बाळगण्याची गरज आहे. जर तुम्ही मैदानात थांबला तर धावा होतील आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांना तुमच्याविरोधात गेम प्लॅन बदलावा लागेल. मैदानात खेळताना आत्मविश्वास दाखवावा लागेल, असेही अजिंक्यने म्हटले आहे. 

विक्रमी खेळीनंतर शेफाली म्हणाली, मुलांसोबत खेळल्याचा फायदा झाला

तत्पूर्वी विराट कोहली म्हणाला होता की, परदेशी खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी बचावात्मक खेळावर भर देऊ नये. आक्रमक खेळ दाखवला तर त्याचा संघाला फायदा होईल. पूर्वीच्या सामन्यात झालेल्या चुका सुधारुन भारतीय संघ सकारात्मक विचारानेच मैदानात उतरेल, असेही कोहलीने म्हटले होते. कर्णधार आणि उपकर्णधार यांनी स्वभावाप्रमाणे भूमिका मांडली असून संवगडी कोणाला फॉलो करुन मालिका वाचवणार हे सामन्याच्या निकालानंतरच समजेल.   

T-20 WC: हॅटट्रिकसह भारतीय महिलांनी दिमाखात गाठली सेमीफायनल!

वेलिंग्टनच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावत १६५ आणि दुसऱ्या डावात १९१ धावांपर्यंत मजल मारली होती. यजमान न्यूझीलंडने हा सामना १० गडी राखून जिंकत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय फंलदाजांचा न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमो निभाव लागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:New Zealand vs India 2nd Test Match Ind vs NZ Ajinkya Rahane some special tips for Batsmen ahead of nz vs ind 2nd test match