पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZ vs IND 1st Test: चौथ्या दिवशीच खेळ खल्लास!

चौथ्या दिवशीच खेळ खल्लास!

वेलिंग्टन कसोटीत भारताचा दुसरा डाव अवघ्या १९१ धावांत आटोपत न्यूझीलंडने चौथ्या दिवशीच पाहुण्या संघाला १० गडी राखून पराभूत केले. चौथ्या दिवशी उप कर्णधार अजिंक्य रहाणे (२५) आणि हनुमा विहारी (१५) यांनी ४ बाद १४४ धावांवरुन भारताच्या डावाला सुरुवात केली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला ४ धावांची भर घालून अजिंक्य रहाणे चालता झाला. ट्रेट बोल्टने त्याला २९ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. साऊथीनं हनुमा विहारीला आज एकही धाव करु दिली नाही. अजिंक्य पाठोपाठ त्याने विहारीलाही माघारी धाडले. ही जोड माघारी फिरल्यानंतर साऊथीच्या भेदक माऱ्यासमोर तळाच्या फलंदाजांना फार काळ तग धरता आला नाही. साऊथीनं अश्विन (४) पंत (२५) आणि बुमराहला खातेही न उघडता माघारी धाडत भारताचा डाव १९१ धावांत आटोपला. 

NZvsIND Day 1: पृथ्वी, मयांक, पुजारा अन् विराटचा फ्लॉप शो!

चौथ्या दिवशी इशांत शर्मानं सर्वाधिक १२ धावा केल्या. त्याला कॉलिन ग्रँडहोमने बाद केले. परिणामी तिसऱ्या दिवशीची ३९ धावांची पिछाडी भरुन काढत भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर अवघ्या ९ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान यजमानांच्या सलामवीरांनी दुसऱ्या षटकाती चौथ्या चेंडूवर पार करत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

NZ vsIND 1st Test Day 2 : दोन दिवसांत एकाच बहाद्दराचं अर्धशतक!

पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फंलदाजी करताना पहिल्या डावात भारतीय संघातील एकालाही अर्धशतकी खेळी करता आली नाही. अजिंक्य रहाणे (४६) मयांक अग्रवाल (३४) आणि मोहम्मद शमीच्या (२१) आणि पंतच्या १९ धावांच्या जोरावर भारताने १६५ धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार केन विल्यम्सन (८९), रॉस टेलर (४४), कॉलिन डी ग्रँडहोम (४३) जामेसन (४४) आणि बोल्टच्या ३८ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४८ धावा करत १८३ धावांची आघाडी घेतली होती. भारताकडून ईशांत शर्माने सर्वाधिक ५ बळी टिपले. न्यूझीलंडकडून टीम साऊथीनं पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ बळी घेत भारतीय फलंदाजंचे कंबरडे मोडले. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवातून सावरुन कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात नेमकं काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

NZ vs IND 1st Test Day 3 : मयांकचं अर्धशतक, आता मदार अंजिक्य-हनुमावर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:New Zealand vs India 1st Test New Zealand thump India by 10 wickets in 1st Test in Wellington