पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZ vs IND 1st Test Day 3 : मयांकचं अर्धशतक, आता मदार अंजिक्य-हनुमावर

पहिल्या कसोटी सामन्यात भारत बॅकफूटवर

वेलिंग्टनच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी कॉलिन डी ग्रँडहोम (४३) कायले जामेसन (४४) आणि बोल्टच्या ३८ धावांच्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद ३४८ धावा करत १८३ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाअखेर भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात १४४ धावा केल्या असून भारताची मदार उप-कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू हनुमा विहारी यांच्यावर आहे.     

NZ vsIND 1st Test Day 2 : दोन दिवसांत एकाच बहाद्दराचं अर्धशतक!

न्यूझीलंडच्या संघाने तिसऱ्या दिवशी ५ बाद २१६ धावांवरुन खेळाला सुरुवात केली  बीजे वॅटलिंग एकाही धावेची भर न घालता १४ धावांवर माघारी फिरला. बुमराहने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी आलेला टीम साऊथीला इशांतने अवघ्या ६ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर कॉलिन डी ग्रँडहोमने कायलेच्या साथीने न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने  आठव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली. ग्रँडहोमने ४३ धावा केल्या. तर कायलेनं संघासाठी ४४ धावांचे योगदान दिले. बोल्डने ३८ धावा करत संघाची धावसंख्या ३४८ पर्यंत पोहचवली. भारताकडून इशांत शर्माने सर्वाधिक ५ बळी टिपले. अश्विनने ३ तर बुमराह-शमी यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला. 

NZvsIND Day 1: पृथ्वी, मयांक, पुजारा अन् विराटचा फ्लॉप शो!

पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवालने भारताच्या डावाची सुरुवात केली. बोल्टने पृथ्वी शॉला अवघ्या १४ धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर पुजारा आणि मंयाकने भारताचा डाव सावरला. मयांकने कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. चेतेश्वर पुजारा ८१ चेंडूत ११ धावा करुन माघारी फिरला. मयांक अग्रवाल ५४ धावांवर बाद झाला. विराट  मोठी खेळी करण्यात पुन्हा अपयशी ठरला. बोल्टने अवघ्या १९ धावांवर त्याला तंबूत धाडले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ ३९ धावांनी पिछाडीवर होता. अजिंक्य रहाणे  २५ तर हनुमा विहारी १५ धावांवर खेळत होते. भारतीय संघाची मदार या जोडीवर अवलंबून आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:New Zealand vs India 1st Test Day 3 Stump Mayank Agarwal half century Virat Kohli Fail indian fan eyes on Ajinkya Rahane and Hanuma Vihari