पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZ vsIND 1st Test Day 2 : दोन दिवसांत एकाच बहाद्दराचं अर्धशतक!

केन विल्यम्सनची ८९ धावांची खेळी

वेलिंग्टनच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी तब्बल दहा गडी बाद झाले. दुसऱ्या दिवशी भारताचा डाव १६५ धावांत आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने कर्णधार केन विल्यम्सनच्या ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर ५ बाद २१६ धावा केल्या असून यजमानांनी ५१ धावांची आघाडी घेतली आहे.

NZvsIND Day 1: पृथ्वी, मयांक, पुजारा अन् विराटचा फ्लॉप शो! 

भारताकडून पहिल्या डावात उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. भारताच्या चार जणांना दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. परिणामी भारताचा पहिला डाव ६८.१ षटकात १६५ धावांत आटोपला. दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे (३८) आणि ऋषभ पंतने (१०) यांनी ५ बाद १२२ धावांवरुन भारताच्या डावाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी संघाच्या धावसंख्येत अवघ्या ८ धावा करुन अजिंक्य रहाणे ४६ धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने त्याच्यापेक्षा एक धावा अधिक करत १९ धावांवर तंबूचा रस्ता धरला. रविचंद्रन अश्विनला साऊथीने खातेही उघडू दिले नाही. इशांत शर्मा ५ धावा करुन माघारी फिरला. मोहम्मद शमीने २० चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने २१ धावा करत भारताची धावसंख्या १६५ पर्यंत पोहचवली.   

Women T20 WC : भारतीय महिलांची विजयी सलामी

भारताचा डाव आटोपल्यानंतर सलामीवीर टॉम लॅथम आणि टॉम ब्लण्डेल यांनीव न्यूझीलंडच्या डावाला सुरुवात केली. इंशांतने लॅथमला ११ तर ब्लण्डेलला ३० धावांवर बाद करत ठरविक अंतराने दोन धक्के दिले. कर्णधार केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. अर्धशतकाच्या जवळ पोहचलेल्या रॉस टेलरला इशांतने ४४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. शमीने सेट झालेल्या विल्यम्सनला ८९ धावांवर बाद करत न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. आर. अश्विनने हेन्री निकोलसला १७ धावांवर बाद केले. दुसऱ्या दिवसाचा डाव थांबवण्यात आला त्यावेळी न्यूझीलंडने ५ बाद २१६ धावा केल्या होत्या. बीजे वॅटलिंग १४ आणि कॉलिन डि ग्रँडहोम ४ धावांवर खेळत होते. दुसऱ्या दिवसाअखेर दोन्ही संघातील एकमेव केन विल्यम्सला अर्धशतकाला गवसणी घालता आली.