पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : कोहलीने घेतलेल्या या विकेटची चर्चा तर होणारच!

कोहलीने हेन्रीला अप्रतिमरित्या धावबाद केले.

न्यूझीलंडविरुद्ध हेमिल्टनच्या मैदानात सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर हेन्री निकोलसने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. एका बाजूने गडी तंबूत जात असताना निकोलसने ७८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या खेळीसमोर गोलंदाज हताश झाले असताना कर्णधार विराट कोहलीने आपल्या क्षेत्ररक्षणातील चपळाई दाखवत त्याला तंबूत धाडले. 

...म्हणून पहिलं वहिलं शतक अय्यरसह संघासाठीही 'स्पेशल'

न्यूझीलंडच्या डावातील २९ व्या षटकात रॉस टेलरने खेळून काढलेल्या चेंडूवर एकेरी धाव घेण्यासाठी नॉन स्ट्राइकवर असलेल्या निकोलसने क्रिज सोडले पण तो धाव पूर्ण करण्यात अपयशी ठरला. विराट कोहलीने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून देत भारताला महत्त्वपूर्ण ब्रेकथ्रू मिळवून दिला. न्यूझीलंड दौऱ्यातील विराट कोहलीने जबरदस्त क्षेत्ररक्षण करत मिळवलेला हा दुसरा बळी आहे.

NZvs IND 1st ODI : सलामीच्या एकदिवसीय सामन्यातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर 

यापूर्वी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात कोहलीने मुन्रोला धावबाद केल्याचे पाहायला मिळाले होते. श्रेयस अय्यरने सीमारेषेवरुन फेकलेला चेंडू कोहलीच्या हातात विसावला अन् स्ट्राइकच्या दिशेने धावणारा मुन्रोनं गती कमी केली. विराटने चपळता दाखवत त्याला माघारी धाडले होते. केन विल्यम्सनच्या अनुपस्थितीत संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभालणाऱ्या लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ४ षटकात ३४७ धावा करुन यजमान न्यूझीलंडसमोर ३४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:New Zealand vs India 1st ODI Virat Kohli Effects Brilliant Run Out Sends Henry Nicholls Packing at Seddon Park Hamilton WATCH VIDEO