पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvsIND: ६ फूट ८ इंच उंचीचा काइल जेमीसन भारताविरोधात करणार पदार्पण

काइल जेमीसन

६ फूट ८ इंच उंचीचा वेगवान गोलंदाज काइल जेमीसन भारताविरोधात शनिवारी ऑकलंड येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडेमध्ये पदार्पण करणार आहे. काइल जेमीसनचा वनडे आणि कसोटी संघात समावेश केला गेला आहे. त्याला पहिल्या वनडेत संघात घेण्यात आले नव्हते. परंतु, ऑकलंड येथील ईडन पार्कमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वनडेत त्याला मैदानात उतरवले जाईल. 

हिंगणघाट प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात; उज्वल निकम मांडणार पीडितेची बाजू

न्यूझीलंडचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन जर्गेनसेन म्हणाले की, त्याची ऊंची चांगली असून आता तो गोलंदाजीत काय कमाल करतो, हे पाहावे लागेल. नवा चेंडू हाताळण्याचे त्याच्याकडे चांगले कौशल्य आहे. तो खूप चांगला अ‍ॅथलिट आहे. त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. तो न्यूजीलंड अ संघाकडून भारत अ संघाविरोधात तीन सामने खेळला आहे. 

वांद्र्यातील घुसखोरांचे मोहल्ले आधी साफ करा, मनसेची पोस्टरबाजी

गॅरी स्टीडऐवजी शेन जर्गेनसेनचा संघात समावेश करण्यात आला आहे. गॅरी स्टीड आजारी असल्यामुळे संघाबाहेर आहे. लेगस्पिनर ईश सोधीला न्यूझीलंड ए संघाकडून खेळण्यासाठी रिलीज केले आहे. याचा अर्थ जेमीसन ईडन पार्कमध्ये पदार्पण करणार आहे. 

जेमीसनने मागील महिन्यात ख्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंड अ कडून भारताविरोधात ३ वनडे सामने खेळले आहेत. भारत अ विरोधात त्याची आकडेवारी ०-६०, २-६९ आणि ४-४९ अशी होती. न्यूझीलंडसाठी दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे केन विल्यम्सनही प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला. तो खांद्याच्या दुखापतीमुळे पहिला वनडे खेळू शकला नव्हता.

राहुल गांधींच्या प्रश्नावरील उत्तरावरून लोकसभेत गदारोळ

लॉकी फर्ग्यूसननेही प्रशिक्षण शिबिरात हजेरी लावली. मागील डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तो जखमी झाला होता. विल्यम्सन तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात संघाबाहेर होता. पहिली वनडे न्यूझीलंडने चार गड्यांनी जिंकली होती. तिसरा वनडे माऊंट मॉनगनईमध्ये मंगळवारी (११ फेब्रुवारी) खेळली जाणार आहे.