पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#ENGvsNZ : किवी अष्टपैलूचा षटकार पाहून प्रशिक्षकांने सोडला प्राण

वर्ल्ड कप फायनल: न्यूझीलंड-इंग्लंड सामन्यातील क्षण

क्रिकेटच्या रंगतदार सामन्यातील काही क्षण क्रिकेट चाहत्याचा मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या घटना आपण यापूर्वी ऐकल्या आहेत. विश्वचषकातील इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील थरारक सामन्यादरम्यानही अशीच घटना घडली. विशेष म्हणजे न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू जीमी नीशमचे बालपणीचे प्रशिक्षक डेव्हिड जेम्स गोर्डन यांनी सुपर ओव्हरमधील थरारक सामना पाहताना आपला अखेरचा श्वास घेतला. सुपर ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला तेव्हा वडिलांनी शेवटचा श्वास घेतला, असे गॉर्डन यांची मुलगी लिओनीने सांगितले. नीशमने सोशल मिडियाच्या माध्यमातून गुरुवारी आपल्या गुरुला श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यानं ट्विटमध्ये लिहिलंय की, "शालेय काळात गॉर्डन हे माझे फक्त शिक्षकच नव्हते तर ते माझे प्रशिक्षक आणि मित्र होते. तुमचे या खेळावर खूप प्रेम होते. तुमचे मार्गदर्शन लाभणे हे भाग्य मानतो." अशा शब्दात नीशमने आपल्या प्रशिक्षकांना श्रद्धांजली वाहिली आहे.  

लॉर्डसच्या मैदानात इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्यानंतर सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हरचा समावेश करण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये देखील दोन्ही संघानी प्रत्येकी १५-१५ धावा करत बरोबरी साधल्यानंतर बाऊंड्री काउंटच्या नियमानुसार इंग्लंडला विजेते घोषीत करण्यात आले होते.