इंडिया अ संघाने पहिल्या अनाधिकृत एकदिवसीय सामन्यात न्यूजीलंड अ संघाला ५ गडी राखून पराभूत केले आहे. न्यूझीलंडच्या अ संघाने प्रथम फलंदाजी करताना ४८.३ षटकात २३० धावा केल्या होत्या. भारतीय संघाने हे आव्हान अवघ्या २९.३ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
भारतीय अ संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
...म्हणून अनिल कुंबळेंनी मानले PM मोदींचे आभार
न्यूझीलंडच्या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. जॉर्ज वर्कर आणि रचिन रविंद्र यांनी ५१ धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र ही जोडी माघारी फिरल्यानंतर न्यूझीलंड संघाचे मोठी धावसंख्या उभारण्याचे गणित बिघडले. वर्करने १४ तर रविंद्रने ४९ धावा केल्या. मध्यफळीतल्या ग्लेन फिलिप्सने २४ कर्णधार टॉम ब्रूस ४७ धावा वगळता अन्य कोणालाही समाधानकारक कामगिरी करता आली नाही. परिणामी न्यूझीलंड अ संघाचा डाव २३० धावांत आटोपला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ बळी टिपले.
न्यूझीलंडमध्ये विराटचं सेल्फी प्रेम,शार्दुल-श्रेयस जोडीही 'फ्रेम'मध्ये
या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पृथ्वी शॉ आणि मंयक अग्रवालने आक्रमक सुरुवात करुन दिली. पृथ्वी शॉने ३५ चेंडूत ५ चौकार आमि ३ षटकाराच्या मदतीने ४८ धावा केल्या. तर मयंक अग्रवालने २९ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने २९ धावांचे योगदान दिले. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ९.१ षटकात ७९ धावांची भागीदारी रचली. ही जोडी माघारी फिरल्यानंतर संजू सॅमसनने २१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ३९ धावा आणि सूर्यकुमार यादवने १८ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३५ धावा कुटत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. विजय शंकर नाबाद २० आणि क्रुणाल पांड्याने १५ धावांची नाबाद खेळी करत भारताच्या विजयाव शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडकडून जिमी नीशमने सर्वाधिक २ गडी बाद केले. भारतीय अ संघाचा अनाधिकृत एकदिवसीय सामन्यातील एकहाती विजय विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी शुभ संकेत देणारा असाच आहे.