पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टी-20 विश्व विक्रम : १३ चेंडूत एकही धाव न देता ६ विकेट घेणारी मर्दानी!

अंजली चंद

South Asian Games 2019: नेपाळ महिला क्रिकेट संघातील महिला गोलंदाज अंजली चंदने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये अनोखा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत मालदीव विरुद्धच्या सामन्यात अंजलीने सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. अंजलीने मालदीव विरुद्धच्या सामन्यात एकही धाव न देता ६ विकेट्स घेतल्या. हा एक विश्वविक्रमच आहे.

सनी लिओनीचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

अंजलीच्या माऱ्यासमोर मालदीव महिलांचा संघ निर्धारित २० षटकात अवघ्या १६ धावांत आटोपला. एवढेच नाही तर अल्प धावांचा पाठलाग करताना नेपाळच्या महिलांनी पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर सामना खिशातही घातला. नेपाळच्या संघाने पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर बिन बाद १७ धावा केल्या. या सामन्यातील अंजलीने  सातव्या षटकात तीन, नवव्या षटकात दोन तर अकराव्या षटकात १ विकेट घेतली. अंजलीने या सामन्यात १३ चेंडूमध्ये एकही धाव न देता ६ महिलांना तंबूत धाडले.

हे फक्त रोहितलाच जमेलं, धमाकेदार खेळीनंतर वॉर्नरने केली भविष्यवाणी

यापूर्वी महिला आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीतील कामगिरीचा विक्रम हा मालदीवच्या मेस एलिसाच्या नावे होता. २०१९ मध्ये एलिसाने चीन विरुद्धच्या सामन्यात ३ धावा खर्च करुन ६ विकेट मिळवल्या होत्या. या सामन्यात मालदीवकडून हमजा नियाज ९ आणि हफसा अब्दुल्ला हिने ४ धावा काढल्या. यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला खातेही उघडता आले नाही. नेपाळकडून श्रेष्ठाच्या १३ धावा आणि अंवतरच्या ४ धावांसह नेपाळने सामना पहिल्याच षटकात जिंकला. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Nepal medium pacer Anjali Chand 6 wickets for 0 run creates T20I history at South Asian Games