पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI: तिरुवनंतपुरम एयरपोर्टवर संजूचं खास स्वागत, पाहा व्हिडिओ

संजू सॅमसन

India vs West Indies, 2nd T20I: विंडीज विरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना तिरुअनंतपुरमच्या मैदानात रंगणार आहे. आज (रविवार) होणारा सामना जिंकून मालिका विजयाच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. य़ा सामन्यासाठी भारतीय संघ  तिरुअनंतपुरमला पोहचल्यानंतर लोकल बॉय आणि यष्टिरक्षक फलंदाद संजू सॅमसनचं खास स्वागत करण्यात आलं. संजू सॅमसनला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.  

दिल्लीत ४ मजली इमारतीला भीषण आग, ४३ जणांचा मृत्यू 

शिखर धवनला झालेल्या दुखापतीनंतर संजू सॅसनची संघात वर्णी लागली आहे. पहिल्या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळाली नव्हती. घरच्या मैदानावर त्याला संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. स्थानिक खेळाडूला पाहण्याच्या इराद्याने आजच्या सामन्यात अनेकजण स्टेडियममध्ये पोहचतील. ग्रीनफिल्डच्या मैदानात संजू सॅमसनचे रेकॉर्ड अगदी उत्तम आहे. त्यामुळे त्याला संधी मिळेल, अशीच त्याच्या चाहत्यांची भावना असेल.

दिल्लीत अग्नितांडवः राष्ट्रपती कोविंद, PM मोदींनी व्यक्त केले दुःख

हैदराबादमध्ये झालेल्या सलामीच्या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विंडीजने या सामन्यात धावांचा डोंगर उभारुनही भारताने आरामात विजय साजरा केला होता. या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षण गचाळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. ही चुकीची पुनरावृत्ती न करता सामन्यात मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. दुसरीकडे हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखण्याची विंडीज संघ प्रयत्नशील असेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ndia vs West Indies 2nd t20i Sanju Samson grand welcome at Thiruvananthapuram airport watch video shares rajasthan royals