पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Ind Vs SL T20 : रोहितच्या एक पाऊल पुढे जाण्याची विराटला संधी

रोहित शर्मा आणि विराट कोहली

नव्या वर्षातील सलामीच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सलामीवीर रोहित शर्माचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ गुवाहाटीच्या मैदानातून टी-२० मालिकेला सुरुवात करेल.  

...म्हणून गुवाहाटीत दाखल श्रीलंकन टीमभोवती दिसली कडेकोट सुरक्षा

गुवाहाटीच्या मैदानात एक धाव काढताच विराट कोहली रोहित शर्माच्या पुढे निघून जाईल. सध्याच्या घडीला विराट कोहली आणि रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजीमध्ये संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहेत.  विराट कोहलने ७५ सामन्यात २ हजार ६३३ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने १०४ सामन्यात २ हजार ६३३ धावांचा पल्ला गाठला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत एक धाव करताच विराट रोहितच्या पुढे निघून जाईल. 

सचिनच्या कौतुकानंतर 'त्या' दिव्यांग मुलानं व्यक्त केल्या मनातील भावना

विराट कोहलीला मागील वर्षात बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विश्रांती दिली होती. रोहित-विराट विंडीज विरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळले होते. या मालिकेदरम्यान दोघांच्यात चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली वर्षाखेर दोघे संयुक्तरित्या अव्वलस्थानी राहिले. 
विराटने वेस्ट इंडिज विरुद्धच्या हैदराबादमध्ये झालेल्या टी-२० सामन्यात ९४ धावांची आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी केली होती. तिसऱ्या सामन्यातही त्याने ७० धावा केल्या होत्याय  विराटने २०१९ मध्ये १० सामन्यात ४६६ तर रोहितने १४ सामन्यात ३९६ धावा केल्या होत्या. टी-२० मध्ये विराटला अद्याप एकही शतक करता आलेले नाही. दुसरीकडे रोहित शर्माने टी-२० मध्ये तब्बल चार शतके झळकावली आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ndia vs srilanka 1st t20 match virat kohli surpassed rohit sharma and achieve massive feat against srilanka