पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक पाऊल पुढे!, राहुल द्रविडच्या मुलाचं खणखणीत द्विशतक

राहुल द्रविड आणि समित द्रविड

टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड आपल्या चिवट खेळीसाठी प्रसिद्ध होता. आपल्या फलंदाजीने त्यान अनेकवेळा टीम इंडियाला सावरले. 'द वॉल' अशीच त्याची ख्याती होती. जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांसमोरही तो अत्यंत आत्मविश्वासाने एक बाजू सांभाळत असत. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे 'मि. डिपेंडेबल' चा पुत्र समित द्रविडनेही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे. समितने १४ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धेत द्विशतक झळकावले आहे.

IPL लिलावावेळी दिसलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण आहे ?

१४ वर्षीय समितने १४ वर्षांखालील आंतरविभागीय स्पर्धेत उपाध्यक्ष एकादशकडून खेळताना धारवाड विभागाविरोधात २०१ धावा केल्या. त्याने २५६ चेंडूत २२ चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली. सामना अनिर्णीत राहिला. समितने दुसऱ्या डावातही चांगली फलंदाजी करत नाबात ९४ धावा केल्या. त्याने तीन विकेटही घेतल्या.

IPL : युसूफ पठाण 'खपला'च नाही, अनसोल्ड खेळाडूंची संपूर्ण यादी

समितने यापूर्वीही आपल्या फलंदाजीची चमक दाखवली आहे. त्याने २०१६ मध्येही टायगर कप क्रिकेट मालिकेत फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलविरोधात बंगळुरु यूनायटेड क्रिकेट क्लबकडून खेळताना १२५ धावांची खेळी केली होती. ९ वर्षीय समितने २०१५ मध्ये १२ वर्षांखालील गोपालन क्रिकेट चॅलेंज स्पर्धेत माली आदिती स्कूलकडून खेळताना विजयी अर्धशतक (७७*, ९३ आणि ७७) करत सर्वश्रेष्ठ फलंदाजाचा किताब पटकावला होता.

IPL Auction 2020 : ऑस्ट्रेलियन कोट्यवधीत खेळले

दरम्यान, राहुल द्रविडने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये भारताकडून १६४ कसोटी सामन्यात ५२.३१ च्या सरासरीने १३२८८ धावा केल्या आहेत. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:nca head rahul dravid son samit dravid smash double century with 22 fours also take three wickets