पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

National Sports Day 2019: पुनिया, दीपासह या खेळाडूंचा होणार सन्मान

राष्ट्रपतींच्या हस्ते या खेळाडूंचा होणार गौरव

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुरुवारी कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रियो पॅराऑलिम्पिक रौप्य विजेती दीपा मलिक यांना देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये हा सोहळा पार पडेल. यासोबतच क्रिकेटर रविंद्र जडेजासह इतर १९ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.  
या कार्यक्रमात  राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य (नियमित आणि जीवनगौरव), अजुर्न पुरस्कार, ध्यानचंद अवॉर्ड, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, तेनजिंग नोग्रे राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि मौलाना अबुल कलाम आजाद (माका) ट्रॉफी देखील प्रदान करण्यात येणार आहे. 

'सुवर्णकन्या' पी. व्ही सिंधूने घेतली पंतप्रधानांची भेट

कुस्तीपटू बजरंग पुनियाने राष्टकुल स्पर्धेसह आशियाई क्रीडा प्रकारात सोनेरी डाव टाकला होता. यापूर्वी त्याने मागील वर्षी हेंगरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती. आगामी टोकिया ऑलिम्पिकमध्ये त्याच्याकडून सुवर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे दीपा मलिक पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी महिली भारतीय महिला ठरली होती. तिने राष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत ५८ तर आंतरराष्ट्रीय स्तरावर २३ पदके जिंकली आहेत. सलग दुसऱ्या वर्षी खेलरत्न पुरस्कार दोन खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहे.

मागील वर्षी  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार  विराट कोहली आणि महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना संयुक्तपणे खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्यास पदक, प्रशस्ती पत्र आणि ७ लाख ५० हजार रुपयांची धनराशी बक्षीस स्वरुपात दिली जाते. अजुर्न, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना छोटी प्रतिमा, प्रमाणपत्र आणि प्रत्येकी पाच-पाच लाख रुपयांचे धनराशी प्रदान करण्यात येते. 

या कार्यक्रमात क्रिकेटर रविंद्र जडेजा आणि पूनम यादव, अ‍ॅथलिट तजिंदर पाल सिंह तूर, मोहम्मद अनस आणि स्वप्ना बर्मन, कबड्डीपटू  अजय ठाकुर, मोटर शर्यतीत गौरव सिंह गील, महिला कुस्तीपटू पूजा ढांडा, पोलो खेळाडू सिमरन सिंह शेरगील, घोडेस्वार फवाद मिजार् सहन १९ खेळाडूंना अजुर्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालचे प्रशिक्षक विमल कुमार आणि राष्ट्रकुल स्पर्धेत चार पदक विजेत्या मनिका बत्राच्या बालपणीचे प्रशिक्षक संदीप गुप्ता यांना नियमित द्रोणाचार्य अवॉर्ड तर माजी  क्रिकेटर गौतम गंभीर याचा प्रशिक्षक संजय भारद्वाज यांना जीवन गौरव वर्गवारीतील द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.    

पुरस्कार विजेत्यांची यादी
राजीव गांधी खेल रत्न: बजरंग पुनिया (कुश्ती) आणि दीपा मलिक (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
 

द्रोणाचार्य अवॉर्ड (नियमित): विमल कुमार (बॅडमिंटन), संदीप गुप्ता (टेबल टेनिस) आणि मोहिंदर सिंह ढिल्लों (अ‍ॅथलेटिक्स)

द्रोणाचार्य अवॉर्ड (लाइफ टाइम): मरजबान पटेल (हॉकी), रामबीर सिंह खोखर (कबड्डी) आणि संजय भारद्वाज (क्रिकेट)
अजुर्न पुरस्कार: तजिंदर पाल सिंह तूर (अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद अनस यहिया (अ‍ॅथलेटिक्स), एस भास्करन (बॉडीबिल्डिंग), सोनिया लाथर (मुक्केबाजी), रवींद्र जडेजा (क्रिकेट), पूनम यादव (क्रिकेट), चिंगलेनसाना सिंह कंगुजम (हॉकी), अजय ठाकुर (कबड्डी), गौरव सिंह गिल (मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत (पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), अंजुम मुद्गिल (नेमबाजी), हरमीत राजुल देसाई (टेबल टेनिस), पूजा ढांडा (कुस्ती), फवाद मिर्जा (घोडेस्वारी), गुरप्रीत सिंह संधू (फुटबॉल), स्वप्ना बर्मन (अ‍ॅथलेटिक्स), सुंदर सिंह गुर्जर (पॅरा स्पोर्ट्स अ‍ॅथलेटिक्स), बी साई प्रणीत (बॅडमिंटन) आणि सिमरन सिंह शेरगील (पोलो)

ध्यानचंद अवॉर्ड: मॅनुअल फ्रेडरिक्स (हॉकी), अरूप बसाक (टेबल टेनिस), मनोज कुमार (कुस्ती), नितिन कीर्तने (टेनिस) आणि सी लालरेमसांगा (तीरंदाजी)

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार: गगन नारंग स्पोर्ट्स, प्रमोशन फाउंडेशन आणि गो स्पोर्ट्स आणि रॉयलसीमा विकास ट्रस्ट

मौलाना अबुल कलाम आजाद (माका) ट्रॉफी: पंजाब यूनीवर्सिटी चंडीगड

तेनजिंग नोग्रे राष्ट्रीय साहस पुरस्कार: अपर्णा कुमार (भू साहस), स्वगीर्य दीपांकर घोष (भू साहस), मणिकंदन के (भू साहस), प्रभात राजू कोली (जल साहस), रामेश्वर जांगडा (वायू साहस), वांगचुक शेरपा (जीवन गौरव)

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:national sports day full list of khel ratna award and arjun award full list rajiv gandhi khel ratna dronacharya