पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीनं भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला : आयसीसी

महेंद्रसिंह धोनी

भारताचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी ७ जूलैला ३८ वर्षांचा होतोय. वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. आयसीसीने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत धोनीच्या कारकिर्दीला सलाम केला आहे. 

भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलण्याचं काम धोनीने केले आहे, असा उल्लेखही आयसीसीने आपल्या ट्विटमध्ये केला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी-२० मध्ये विश्वचषक जिंकला होता. याशिवाय चॅम्पियन्स चषकासह एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटच्या आयसीसी क्रमवारीत संघाने अव्वल स्थान पटकावले होते. आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला विशेष उपलब्धी देणारा धोनी हा क्रिकेट जगतातील  एकमेव कर्णधार आहे.

धोनी म्हणतो; मी कधी निवृत्त होणार मलाच माहिती नाही, पण..

कर्णधारपदाचा राजीनामा आणि कसोटीतील निवृत्तीनंतर आजही धोनी संघाचा अविभाज्य घटक आहे. त्याच्या अनुभवाचा संघाला नेहमी फायदा होताना पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगत असताना त्याच्या अनेक क्रिकेट चाहत्यांना त्याने आणखी काही दिवस खेळत रहावे, असा सूरही पाहायला मिळत आहे.