दक्षिण आफ्रिकच्या मैदानात सुरु असलेल्या मजांसी सुपर लीग (एमएसएल) च्या मैदानात खिलाडीवृत्तीचा अफलातून नजारा पाहायला मिळाला. खेळ भावना कशी असावी, याच एक उत्तम उदाहरण म्हणूनच या क्षणाकडे पाहायला हवे. पार्ल रॉक्स आणि नेल्सन मंडेला बे जायंट्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात हा अप्रतिम क्षण अनुभवायला मिळाला. प्रतिस्पर्धी खेळाडूला धावबाद करण्याची संधी गमावून एका गोलंदाजाने सर्वांची मन जिंकली.
Spirit of cricket🤝
— Mzansi Super League 🔥 🇿🇦 🏏 (@MSL_T20) December 8, 2019
Raise your hand for more moments like this! Always! 🖐️🖐️🖐️🖐️#mslt20 pic.twitter.com/5nA8q9rQ2U
लष्करातील शूरवीरांवर मालिका, महेंद्रसिंग धोनी करणार निर्मिती
श्रीलंकेच्या इसुरु उडाना याला स्वत: च्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी फलंदाजाला धावबाद करण्याची आयती संधी मिळाली. पण प्रतिस्पर्धी फलंदाज दुखापतीने त्रस्त दिसताच इसुरुने त्याला धावबाद न करता त्याला क्रिजमध्ये पोहचू दिले. नेल्सन मंडेला बे जायंट्सचा संघ फलंदाजी करत होता. पार्ल रॉक्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना १९ व्या षटकात दक्षिण आफ्रिकन फलंदाज हीनो कुन आणि मार्को मराइस क्रीजवर होते.
WADA ची रशियावर कारवाई, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याला ४ वर्षांची बंदी
८ चेंडूत २४ धावांची आवश्यकता असताना कुनने टोलावलेला चेंडू नॉन स्टाईकवर असलेल्या मार्को मराइसला लागला. तो मैदानात कोसळल्यानंतर चेंडू सरळ गोलंदाजीला असलेल्या इसुराच्या हातात गेला. धावबाद करण्याची त्याच्याकडे संधी असताना त्याने खिलाडूवृत्ती दाखवून दिली. त्याच्या या खेळ भावनेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नेल्सन मंडेला बे जायंट्सच्या संघाने हा सामना १२ धावांनी गमावला.