पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : अप्रतिम त्रिफळा उडवला, पण वहाबचाच 'बकरा' झाला

वहाबचा हा यॉर्कर डोळ्याचे पारणे फेडणारा होता. पण त्याला विकेट मात्र मिळाली नाही.

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज वहाब रियाजन सध्या मंजासी सुपर लीगमध्ये  (एमएसएल) मध्ये खेळताना दिसत आहे. केप टाउन ब्लिट्स टीमचे प्रतिनिधीत्व करताना या लीगच्या २२ व्या सामन्यात वहाबने एका अप्रतिम यॉर्करवर प्रतिस्पर्धी फलंदाला अक्षरश: गुडघे टेकायला लावले. मात्र विकेट मिळवण्याचा त्याचा जल्लोष क्षणार्धात मावळला. नो बॉल असल्यामुळे अप्रतिम विकेट मिळवूनही त्याच्या पदरी निराशा आली. आणि फ्री हिटच्या रुपात फलंदाजालाच गिफ्ट मिळाले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Best no ball ever

A post shared by cricket Videos (@cricket.latest.videos) on

रणजी ट्रॉफी : मुंबई संघाची घोषणा, पृथ्वीसह अजिंक्यच्या नावाचाही समावेश

केप टाउन ब्लिट्स आणि टीश्वाने स्पार्टन्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात हा सर्व प्रकार पाहायला मिळाला. क्रिकेटच्या इतिहासातील खतरनाक यॉर्कर काय असतो? याची अनुभूती त्याने  दाखवून दिली.  मात्र फ्रंन्टफूट नो बॉलमुळे त्याचा चेंडू पंचांनी अवैध ठरवत फलंदाजाला फ्री हिट दिली. वहाबने आपल्या अप्रतिम यॉर्करने रोएपल्प वन डर मर्वच्या दांड्या गुल केल्या. मात्र त्याचा आनंद वहाब साजरा करु शकला नाही. 

... तर या खेळाडूंना आयपीएलमध्ये मिळू शकेल तगडी रक्कम

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर क्रिकेट चाहत्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वहाबने आपल्या कोट्यातील अखेरच्या षटकात अप्रतिम यॉर्कर चेंडू टाकत मिडल आणि ऑफ स्टंप्स विखरुन फलंदाजाला गुडघे टेकायला भाग पाडले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना   केप टाउन ब्लिट्सने निर्धारित २० षटकात १५८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना  टीश्वाने स्पार्टन्स टीम निर्धारित २० षटकात १४२ धावांपर्यंत मजल मारता आली. केप टाउन ब्लिट्सने हा सामना १५ धावांनी जिंकला. वहाबने या सामन्यात १८ धावा खर्च करत दोन बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mzansi Super League 2019 MSL Wahab Riaz s toe-crushing yorker uproots Roelof van der Merwe s stumps