पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईकराचा द्विशतकी विश्वविक्रम 'यशस्वी'

यशस्वी जयस्वाल

मुंबई संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत अनोख्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. सर्वात कमी वयात (१७ वर्षे आणि २९२ दिवस) द्विशतकी खेळी करण्याचा कारनामा त्याने करुन दाखवला आहे. निर्धारित ५० षटकांच्या खेळातील स्थानिक क्रिकेट आणि एकदिवसीय सामन्यातील हा एक विश्व विक्रम आहे. 

विराटच्या 'डोन्ट व्हरी बी हॅप्पी' ट्विटनंतर शास्त्री ट्रोल

देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे स्पर्धेतील झारखंड विरुद्धच्या सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेच्या अॅलन बारोने केलेल्या स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कमी वयात केलेल्या द्विशतकाचा विक्रम मागे टाकला. आफ्रिकेच्या फलंदाजाने तीन वर्षांपूर्वी २० वर्षे २७३ दिवस इतके वय असताना द्विशतक झळकावले होते. 

टी-20 : भारत-पाक सामना खेळवण्यासाठी ICC उत्सुक, पण...

अ गटातील झारखंड विरुद्धच्या सामन्यान यशस्वीने १२ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने १५४ चेंडूत २०३ धावांची दमदार खेळी केली. डावखुऱ्या यशस्वी जयस्वालच्या खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने ३ बाद ३५८ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना झारखंडचा डाव ४६.४ षटकात ३१९ धावांत आटोपला. या स्पर्धेतील आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यात यशस्वीने ५८५ धावा केल्या असून तो  सर्वात आघाडीवर आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mumbai teen Yashasvi Jaiswal smashes world record with double hundred in Vijay Hazare Trophy match