पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'महापरिनिर्वाण दिनी भारत-विंडीज सामन्यासाठी पोलीस बंदोबस्त अशक्य'

मुंबई पोलीस

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात ६ डिसेंबरला मुंबईच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्याला सुरक्षा पुरवू शकना नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिली आहे.  ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे. याशिवाय अन्य काही कार्यक्रमामुळे मुंबई पोलिसांनी सामन्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरवणार नाही, असे म्हटले आहे. महापरिनिर्वाण दिनी चत्यभूमी येथे बाबासाहेबांचे अनुयायांयी मोठ्या संख्येने मुंबईत येत असतात. मुंबई पोलीस या कार्यक्रमाच्या बंदोबस्तामध्ये व्यग्र असणार आहेत.  

ऐतिहासिक सामन्याची उत्सुकता भारत-पाक सामन्यासारखी: कोहली

वेस्ट इंडीजचा संघ भारत दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखडेच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. दुसरा टी-२० सामना हा तिरुअनंतपूरम तर तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना हैदराबादच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. याशिवाय चेन्नई, विशाखापट्टणम आणि कटक येथे तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सामने खेळवण्यात येणार आहेत.  

Pink Ball Test : ईडन गार्डनवर वाहतेय गुलाबी हवा...

मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्यावेळी सुरक्षा पुरवणे अशक्य असल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनला देण्यात आली आहे. अन्य कार्यक्रम असल्यामुळे पोलीस बदोबस्त या कार्यक्रमाच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार असल्यामुळे पोलीस सुरक्षा पुरवणे अशक्य असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.  

अनुष्कानंतर आता विराटचाही होणार सन्मान

मुंबई पोलिसांनी सुरक्षा देणे अशक्य असल्याचे स्पष्ट केल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनला खासगी सुरक्षा कंपनीकडून सेवा घ्यावी लागू शकते. मागील वर्षी देखील सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर वानखडेच्या मैदानातवरील सामना हा ब्रेबोर्न स्टडियमवर स्थलांतरित करावा लागला होता. आंतररष्ट्रीय सामन्यासाठी बंदोबस्तासाठी जवळपास १ हजार पोलिसांचा फौजफाटा लागतो. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Mumbai Police not provided security for the India West Indies T20I match at the Wankhede Stadium because Baba Saheb Ambedkar Parinirvan Diwas