पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई मॅरेथॉन: हाफ मॅरेथॉनमध्ये या मराठमोळ्या महिलांनीही मारली बाजी

मुंबई मॅरेथॉन

आशियातील सर्वात मोठी आणि मानाचा 'गोल्ड लेबल' दर्जा मिळालेली मुंबई मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली.  यंदाच्या स्पर्धेत मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास नऊ हजार अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कडाक्याच्या थंडीत मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत स्पर्धेचे महत्त्व दाखवून दिले.  

मुंबई मॅरेथॉनः ६४ वर्षीय स्पर्धकाचा हृदयविकाराने मृत्यू

इथिओपिआच्या डेरारा हरीसाने मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत अर्थात एलिट रनमध्ये यंदाही इथिओपिआच्या धावपटूंनी वर्चस्व ठेवल्याचे पाहायला मिळाले. पुरुष गटात डेरारा हरीसा विजेता ठरला. तर महिला गटात अमाने बेरीसोने बाजी मारली. महिलांच्या हाफ मॅरेथॉन गटात मराठमोळ्या धावपटूंनी  बाजी मारली उत्तर प्रदेशची पारुल चौधरी हिने प्रथम, तर मुंबई कस्टमची आरती पाटील दुसरी आणि नाशिकच्या मोनिका अथरेनं तिसरा क्रमांक पटकवला. भारतीय फुल मेरेथॉन प्रकारात पुरुषांमध्ये श्रीनू बुगथा आणि महिलांमध्ये सुधा सिंघने अव्वल कामगिरी नोंदवली.  

पुण्यात पब्जी खेळताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

देशविदेशातल्या पंचावन्न हजारांहूनही अधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. हौशी धावपटूंच्या फुल मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री छगन भुजबळ यानी वरळी येथून ड्रीम रनला हिरवा कंदील दाखवला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mumbai Marathon 2020 Srinu Bugatha Sudha Singh win Indian Elite Full Marathon Ethiopias Amane Beriso International Elite Full Marathon Womens category