पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2019, चेन्नई एक्स्प्रेसपूर्वी मुंबई लोकल फायनल स्टेशनला!

सूर्यकुमारच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सची फायनलमध्ये धडक


घरच्या मैदानावर खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा ६ गडी आणि ९ चेंडू राखून पराभव करत मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील फायनल स्टेशन गाठले आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या चार धावांवर बाद झाल्यानंतर फार्मात असलेला क्विंटन डिकॉकनेही तंबूचा रस्ता पकडला. दोन गडी झटपट गमावल्यानंतर सूर्यकुमार यादवने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने १० चौकाराच्या मदतीने ५४ चेंडूत नाबाद ७१ धावांची खेळी करत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला ईशान किशनने (२८) आणि हार्दिक पांड्याने नाबाद १३ धावा करत उत्तम साथ दिली. चेन्नईकडून इम्रान ताहिरने दोन तर हरभजन  सिंग आणि दिपक चहरने प्रत्येकी एक गडी बाद केला.

विराटच्या टीम परफॉमन्सवर कर्ज बुडव्या माल्ल्याची टिवटिव

आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईला मुंबई इंडियन्सने १३१ धावांत रोखले होते. नाणेफेक जिंकून धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण चेन्नई सुपर किंग्जच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशजनक कामगिरी केल्यामुळे चेन्नईचा संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. त्यानंतर अंबाती रायडूच्या नाबाद ४२ धावा आणि धोनीने शेवटपर्यंत थांबून केलेल्या ३७ धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जला निर्धारित २० षटकात ४ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून राहुल चहरने सर्वाधिक दोन गडी बाद केले. तर जयंत यादव आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी एक गडी टिपला. 

'नो बॉल'मुळे धोनी वाचला, ट्विटरवर बुमराह 'ट्रेंड'

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची आणखी एक संधी आहे. त्या संधीचा ते फायदा करुन घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.