पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2019: फायनलपूर्वी रोहित शर्माचे देव दर्शन

रोहित शर्मा आपल्या कुटुंबियांसमवेत

आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा एकदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झालाय. हैदराबादच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यापूर्वी खेळाडूंना चांगली विश्रांतीही मिळाली आहे. दरम्यान अंतिम सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज रोहित शर्माने तिरुपतीला भेट दिली. गुरुवारी त्याने आपली मुलगी आणि पत्नी रितिका यांच्यासोबत तिरुपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. रोहितची पत्नी रितिका सजदेह/शर्माने आपल्या इन्टाग्राम अकाउंटवरुन तिरुपतीच्या भेटीतील फोटो शेअर केले आहेत.  

यापूर्वी रोहित शर्मा वानखेडेच्या मैदानात आपल्या लेकीसह विजयाचा आनंद साजरा करताना दिसला होता. त्याच्या मैदानातील सेलिब्रेशनच्या फोटो सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियताही मिळाली होती. याच फोटोप्रमाणे तिरुपतीमधील रोहितचा कुटुंबियासोबतचा फोटोही चाहत्यांना चांगलाच भावला आहे.       

मंगळवारी पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईला पराभूत करत मुंबई इंडियन्सने थेट आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. हैदराबादच्या मैदानात रविवारी रंगणाऱ्या सामन्यापूर्वी मुंबईच्या खेळाडूंना चार दिवसांची विश्रांती मिळाली आहे. शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुसऱ्या क्वालिफायरचा सामना रंगणार आहे. यातील विजेता रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळेल. 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mumbai indians skipper rohit sharma offers prayers at venkateswara temple in tirupati ahead of ipl final