पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई इंडियन्स, हैदराबाद अन् वॉर्नर यांच्यातील कमालीचा योगायोग!

मुंबई इंडियन्सचे जेतेपद आणि वॉर्नरच्या खेळीतील अनोखा योगायोग

आयपीएलच्या बाराव्या हंगामातील हैदराबादच्या मैदानात रंगलेल्या अंतिम सामन्यात बाजी मारत मुंबईने चौथ्यांदा आयपीएल विजेता होण्याचा पराक्रम केला. या विजयासह मुंबई इंडियन्सच्या संघासोबत काही कमालीच्या योगायोगाच्या घटनांची नोंद झाली.
हैदराबादच्या मैदानात झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जजा अवघ्या एका धावेनं पराभूत करत विजेतेपद पटकवले. विशेष म्हणजे याच मैदानावर २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सने स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या राइजिंग पुणे सुपरजायंट्सला एका धावेनं पराभूत करत तिसऱ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरले होते. या सामन्यात देखील मुंबई इडियन्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १२९ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना राइजिंग पुणे सुपरजायंट्सने ६ बाद १२८ धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसला होता.  

Video : बर्थडे बॉय पोलार्डने असा व्यक्त केला संताप!

दुसरा कमालीचा योग म्हणजे २०१५ पासून सनरायजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने ऑरेंज कॅप पटकावली आहे. त्यावर्षी मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले आहे. २०१५ मध्ये डेव्हिड वॉर्नरने १४ सामन्यात ५६२ धावा करत ऑरेंज कॅप मिळवली. त्या हंगामात कोलकाताच्या ईडन गार्डनवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईला पराभूत केले. 

वॉटसनसह चेन्नई ट्रॅकवरुन घसरली, मलिंगाच्या जीवावर मुंबईचा विजयी चौकार

२०१७ च्या आयपीएल हंगामातही डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या हंगामात हैदराबादमध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राइजिंग पुणे सुपरजायंट्सला पराभूत केले. यंदाच्या बाराव्या हंगामात १२ सामन्यातील १२ डावात ६९२ धावांची खेळी करुन डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप मिळवण्याचा पराक्रम केला. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने हैदराबादच्या मैदानावर रंगलेल्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला नमवत सर्वाधिकवेळा आयपीएलवर नाव कोरण्याचा पराक्रम करुन दाखवला.