भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीनं निवृत्ती घेतल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर पुन्हा एकदा उढाण आलं. मात्र धोनीनं निवृत्ती घेतल्याच्या बातम्या या निव्वळ अफवा असल्याचं निवड समितीचे प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांनी सांगितलं.
'पद्म' पुरस्कारांसाठी या महिला खेळाडूंच्या नावांची शिफारस
सकाळपासूनच धोनीनं निवृत्ती घेतल्याची चर्चा ट्विटरवर रंगली मात्र या बातम्या निराधार असल्याचं एम.एस.के.प्रसाद यांनी सांगितलं. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
MSK Prasad, Chief Selector: No update on MS Dhoni's retirement, the news is incorrect. pic.twitter.com/uLbzVdfmuf
— ANI (@ANI) September 12, 2019
A game I can never forget. Special night. This man, made me run like in a fitness test 😄 @msdhoni 🇮🇳 pic.twitter.com/pzkr5zn4pG
— Virat Kohli (@imVkohli) September 12, 2019
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं धोनीसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आणि अल्पावधितच धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली. मात्र याबद्दल आमच्याकडे कोणतीही माहिती नसल्याचं एम.एस.के.प्रसाद यांनी स्पष्ट केलं.