पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीबाबतच्या प्रश्नावर एमएसके प्रसाद यांचा मास्टर स्ट्रोक

धोनी आणि पंत

भारतीय क्रिकेट मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबाबत काही महत्त्वाचा गोष्टी सांगितल्या आहेत. याशिवाय त्यांनी निवड समितीवर करण्यात आलेल्या आरोपांना चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. निवड समितीने भविष्याचा विचार करुन योग्य निर्णय घेण्यात असक्षम ठरली असती तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या कसोटीत चांगली कामगिरी करताना दिसले नसते, असे एमएसके प्रसाद यांनी म्हटले आहे.  

महेंद्रसिंह धोनीचे संघातील स्थान टिकवण्यासाठी निवड समितीने मध्यफळीतील समतोलमध्ये तडजोड केली का? असा प्रश्न एमएसके प्रसाद यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, विश्वचषकातील सेमीफायनलमधील खराब सुरुवातीनंतर जडेजा आणि धोनीने जर विजय खेचून आणला असता तर या जोडीच्या खेळीला आपण दाद दिली असती. धोनी आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ यष्टिरक्षक आणि फिनिशर आहे. विश्वचषक स्पर्धेत यष्टिमागे आणि फलंदाजीत धोनी टीमची ताकद होता, असे ते म्हणाले.

प्रशिक्षक निवडीसंदर्भात मत मांडण्याचा विराटला अधिकार : गांगुली

निवड समिती भविष्याबाबत सतर्क नसल्याच्या आरोपवर ते म्हणाले की, जर निवड समिती संघाच्या भविष्याबाबतची रणनिती आखण्यात सक्षम नसती तर मर्यादित षटकांच्या सामन्यात दबदबा निर्माण करणारा जसप्रीत बुमराह कसोटीमध्ये त्याच ताकदीनं खेळताना दिसला नसता. टी-२० स्पेशलिस्ट हार्दिक पांड्या सध्याच्या घडीला तिन्ही प्रकारात अष्टपैलू कामगिरी करत असल्याचे सांगत त्यांनी निवड समितीवरील आरोप खोडून काढले. यावेळी एमएसके प्रसाद यांनी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल याचेही उदाहरण दिले. अश्विन आणि जडेजा प्रतिभावनंत गोलंदाज असतानाही निवड समितीने युवा फिरकीपटूंना योग्य संधी दिल्याचे ते म्हणाले. याशिवाय ऋषभ पंतने अगदी कमी कालावधीत कसोटीत संधी दिल्याचा दाखलाही त्यांनी दिला. 

गावसकरांचे विराटसंदर्भातील वक्तव्य माजरेकरांना खटकलं

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: msk prasad statement on ms dhoni jasprit bumrah and hardik pandya india tour to west indies 2019