पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'या' खेळाडूत धोनीची जागा घेणाऱ्या पंतला टक्कर देण्याची क्षमता

केएस भारत

महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगत असताना ऋषभ पंत धोनीची जागा घेण्यासाठी सक्षम आहे का? असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात उपस्थित केला जातो. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात पंतला टी-२०, एकदिवसीय संघासोबतच कसोटी संघातही स्थान मिळाले. भविष्यातील टीम इंडियाच्या बांधणीसाठी यष्टिरक्षक म्हणून पंतच पहिली पसंती असल्याचा प्लॅनही निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी उघड केला. 

पंतसोबत कसोटीसाठी वृद्धिमान साहने संघात कमबॅक केले. यावर बोलताना एमएसके प्रसाद म्हणाले की, युवा यष्टिरक्षक आणि फंलदाज के. एस. भारत याचाही आम्ही कसोटी संघात निवड करण्यासाठी विचार केला. पण अखेरच्या क्षणी वृद्धिमान साहची निवड करण्यात आली. 

धोनीच्या निवृत्तीवर एमएसके प्रसाद यांची रिअ‍ॅक्शन

ते पुढे म्हणाले, विंडीज दौऱ्यावर पंत तिन्ही प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करेल. त्यामुळे त्याच्यावरील ताण कमी करण्यासाठी काहीवेळा साह आणि केएस भारत यांचा प्रयोग करावा लागेल. कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या के भारत खूप जवळ होता. पण आपल्याकडे अलिखित नियम आहे की, जेव्हा संघातील सिनिअर खेळाडू दुखापतीतून सावरला असेल तर त्याला संधी द्यावी लागते. त्यामुळेच केएस भारत ऐवजी साहला संधी देण्यात आली आहे.  

ज्युनिअर टीम इंडियाने विंडीज अ विरुद्धची मालिका जिंकल

केएल भारतने टीम इंडियाच्या 'अ' संघाकडून खेळताना आपल्यातील क्षमता दाखवून दिली आहे. विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करताना ज्युनिअर संघातील कामगिरीच्या जोरावरच श्रेयस अय्यर, नवदीप सैनी, या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: msk prasad reveals wicketkeeper ks bharat was very close to get test berth for india tour of west indies ms dhoni rishabh pant