पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुढच्या दोन मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धोनीविषयीचा संभ्रम कायम

महेंद्रसिंह धोनी

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय टी-२० आणि एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. नव्या वर्षात श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी २० मालिकेने भारतीय संघ नवा अध्याय रचण्यासाठी सज्ज होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यात ५ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. 

पाक गोलंदाज अन् भारतीय सुरक्षा रक्षकाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका १४ जानेवारी पासून १९ जानेवारी या कालावधीत खेळवण्यात येईल. दोन्ही मालिकेसाठी यष्टिरक्षक म्हणून पुन्हा एकदा ऋषभ पंतलाच संधी देण्यात आली आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीच्या पुनरागमनाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.  

तुला मानलं रे ठाकूर! विराटकडून शार्दुलचं मराठीतून कौतुक

निवड समितीचे मुख्य अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी संघाच्या घोषणा झाल्यानंतर धोनीच्या भविष्यासंदर्भातील प्रश्नाला सामोरे जावे लागले. आगामी काही मालिकेसाठी धोनी भारतीय संघात खेळताना दिसेल का? असा प्रश्न एमएसके प्रसाद यांना विचारण्यात आला होता. यावर एमएसके प्रसाद यांनी चेंडू पुन्हा धोनीच्या कोर्टात टोलवल्याचे पाहायला मिळाले. पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी धोनीने पहिल्यांदा खेळायला सुरुवात तर करायला हवी. त्यानंतरच त्याच्याबाबत विचार होऊ शकतो. त्यामुळे तो पुनरागमन कधी करेल, हे मी सांगू शकत नाही, असे एमएसके प्रसाद यांनी म्हटले आहे.  

VIDEO : मुंबईकर शार्दुलनं जिंकलं अन् जिंकवलं, विराटही भारावला

इंग्लंडमध्ये रंगलेल्या आयसीसी विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर धोनी भारतीय संघात दिसलेला नाही. यापूर्वी धोनीला कधीपर्यंत विश्रांती घेणार असा प्रश्नही विचारण्यात आला होता. यावेळी त्याने जानेवारीपर्यंत काहीच विचारु नका असे म्हटले होते. मात्र जानेवारीमध्ये होणाऱ्या दोन मालिकेतही तो खेळताना दिसणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. जानेवारीच्या अखेरीस भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र धोनीने अद्याप खेळायला सुरु केले नसल्यामुळे या दौऱ्यावरही त्याची निवड होण्याची शक्यता कमी आहे.  

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीचा भारतीय संघ 
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, मनीष पांडे, वाशिंगटन सुंदर आणि संजू सैमसन.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीचा भारतीय संघ
 विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, केदार जाधव, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि जसप्रीत बुमराह.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:msk prasad on ms dhoni selection says i cant comment on that bcci announced t20 team against sri lanka and odi team against australia