पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: धोनीचा निवृत्तीनंतरचा प्लॅन व्हायरल!

महेंद्रसिंह धोनी

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यंदाच्या  विश्वचषक स्पर्धेतनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात रंगते आहे. धोनीच्या एका व्हिडिओमुळे या चर्चेत आता आणखी भर पडली आहे. महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात धोनी निवृत्तीनंतर आपण काय करणार याबाबत माहिती देताना दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून धोनीने क्रिकेटशिवाय असणाऱ्या त्याच्या आवडी निवडी देखील सांगितल्या आहेत. 

जर धोनी असेल तर मी पुढचा वर्ल्ड कप खेळेन : एबी

एका फॅन पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये धोनी म्हणतो की, या गोष्टीसाठी अजून खूप वेळ आहे. पण मी तुमच्यासोबत एक रहस्य शेअर करतोय. मला बालपणापासून पेंटिंगचा खूप छंद आहे. निवृत्तीनंतर पेंटिंगमध्ये काहीतरी करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे. तसेच त्याने कला प्रदर्शनाचाही उल्लेख केल्याचे दिसते. काही नेटकरी हा व्हिडिओ जुना असल्याचा दावा देखील करत आहेत.  

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक आणि २०११ मध्ये झालेली मर्यादीत षटकांची विश्वचषक स्पर्धेसह २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली होती. भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून धोनीला ओळखले जाते.  सध्याच्या घडीला विराट कोहली हा  भारतीय संघाचाकर्णधार असला तरी धोनी त्याला मैदानावर अनेकदा मार्गदर्शन करताना पाहायला मिळते.