पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: गर्दीतून धोनीला बाहेर काढण्यासाठी हेअरस्टायलिस्ट झाली बॉडीगार्ड

एम एस धोनी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी बर्‍याच दिवसांपासून क्रिकेटपासून ब्रेकवर आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात आयसीसी विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर तो एकही सामना खेळला नाही. धोनी ब्रेकवर असून सुध्दा लोकांमध्ये त्यांची क्रेझ अजिबात कमी झालेली नाही. हे मुंबईमध्ये दिसून आले आहे.

सुनील कुमारचा सुवर्ण डाव, भारताचा २७ वर्षांपासूनचा दुष्काळ संपला

महेंद्र सिंह धोनी मुंबईमध्ये एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी आला होता. धोनीला पाहण्यासाठी त्याठिकाणी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. धोनी येताच त्याच्या चाहत्यांनी फोटो काढण्यासाठी त्याला घेराव घातला. त्यावेळी धोनीची हेअरस्टायलिस्ट सपना भावनानी त्याची बॉडीगार्ड बनली. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

IPL 2020 :यंदा स्पर्धेत या नव्या गोष्टी पाहायला मिळणार!

हेअरस्टायलिस्ट सपनाने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने सुंदर कॅप्शन दिले आहे. '९० टक्के सुरक्षा, १० टक्के हेअर आणि ५०० टक्के फॅनगर्ल.' सपना गेल्या अनेक वर्षांपासून महेंद्र सिंह धोनीची हेअरस्टायलिस्ट आहे. ती धोनीला कॅप्टन साहेब या नावाने हाक मारते. 

'सन ऑफ मिस्टर रिलायबल' समितचे दोन महिन्यांच्या आता दुसरे द्विशतक!

महेंद्र सिंह धोनी पुढच्या महिन्यामध्ये इंडियन प्रीमियर लीगसोबत (आयपीएल) क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. धोनी गेल्या ८ महिन्यांपासून क्रिकेटचा सामना खेळला नाही. विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव केला होता. तर, धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देईल असे म्हटले जात असले तरी स्वत: धोनीने याबाबत कोणतिही अधिकृत माहिती दिली नाही. 

Video : मास्टर ब्लास्टर सचिन ठरला लॉरियस पुरस्काराचा मानकरी