पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनी १५ सदस्यीय संघात असला तरी टीम इलेव्हनमध्ये नसेल

महेंद्रसिंह धोनी

भारतीय संघाच्या विश्वचषक मोहिम बारगळल्यानंतर आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीची संघात निवड होणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांसह तमाम क्रिकेट प्रेमींना पडला होता. मात्र शुक्रवारी संघ निवडीच्या प्रक्रियेपुर्वीच धोनीने मालिकेतून माघार घेतल्याचे वृत्त आहे.

भारतीय संघात पुनरागमन करण्याचा मनीष पांडेला विश्वास   

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, धोनीने विडींज दौऱ्यासाठी उपलब्ध राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्याच्या ऐवजी ऋषभ पंत संघात स्थान मिळणे निश्चित आहे. धोनीच्या मार्गदर्शनाचा संघाला फायदा होत असल्याच्या कारणामुळे धोनीला १५ सदस्यीय संघात स्थान मिळू शकेल. मात्र तो मैदानात उतरणार नाही. ऋषभ पंत जोपर्यंत जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम होत नाही तोपर्यंत धोनी त्याला तयार करणार असल्याचेही बोलले जात आहे. शुक्रवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे, यावेळी निवड समिती नक्की काय भूमिका घेणार पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दोन दिवसांत धोनीच्या भविष्याचा कल समजणार

विश्वचषक स्पर्धेपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा जोर धरत आहे. एकाबाजूला त्याच्यावर टीका होत असताना त्याचा चाहता वर्ग धोनीने तुर्तास निवृत्तीचा विचार करु नये, असा ट्रेंड पाहायला मिळाला होता. भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांनी देखील विश्वचषकातील पराभवानंतर धोनीने निवृत्त होऊ नये, अशी भावना व्यक्त केली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ms dhoni will not go to west indies no longer first choice wicket keeper will prepare rishabh pant says report