पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: तुटपुंज्या मदतीवरुन धोनीला ट्रोल करणाऱ्यांवर साक्षी भडकली

महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनी आपल्या मुलीसह (संग्रहित छायाचित्र)

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिहने 100 कुटुंबियांना एक लाखाची मदतीचा हात पुढे केल्यामुळे तुटपूंजी मदत केली, अशा आशयाने त्याला ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर धोनीवर आगपाखड करणाऱ्या नेटकऱ्यांचा त्याची पत्नी साक्षीने समाचार घेतला आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत नेमकी धोनीने लाखाचीच मदत करण्यामागच कारणही सांगितले आहे.  

पुण्यातील शास्त्रज्ञांनी टिपली जीवघेण्या कोरोनाची प्रतिमा

कोरोनामुळे देशातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे मजदूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. धोनीने अशा मजदरांसाठीच्या मदत निधीत एक लाख रुपये दिले होते. एका सामाजिक संस्थेला मजदूरांसाठी 12.50 लाखांची मदत करायची होती. या संस्थेत या रकमेसाठी एक लाख रुपये कमी पडत होते. धोनीने ही कमी पूरी करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता, असे साक्षीने स्पष्ट करत तुटपुंज्या मदतीवर स्पष्टीकरण दिले आहे.  

कोरोना : कनिका कपूरची प्रकृतीत सुधारणा, पण...

कोरोना विषाणूच्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवस म्हणजेच तीन आठवडे लॉकडाऊनची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण भारतात उद्योग धंदे बंद असणार आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता कोणताही उद्याग सुरु राहणार नाही. परिणामी हातावर पोटभरणाऱ्या मजदूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. वेगेवगळ्या सामाजिक संस्था, खासगी कंपन्या आणि प्रसिद्ध व्यक्तींकडून अशा लोकांसाठी मदत निधी गोळा करुन त्यांच्यावरील संकट कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.