भारतीय संघातील लोकप्रिय चेहरा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विश्वचषक स्पर्धेपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. क्रिकेटपासून दूर असलेल्यानंतर निवृत्तीपासून ते काश्मीरमध्ये गस्त घालण्यापर्यंतच्या वृत्तामुळे चर्चेत होता. त्यानंतर आता त्याच्या एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे.
देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र परवाना द्यावा, हिनाची शहांकडे मागणी
रांची येथील घरी धोनी आणि साक्षी यांनी मित्रमंडळीसोबत धमाल मजा केली. यावेळी धोनीने चक्क गाणे गायल्याचे समोर येत आहे. साक्षीची मैत्रिण प्रीती सिमोसने इंस्टाग्रामच्या माध्यमातून धोनी गात असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना प्रीतीने याला भन्नाट कॅप्शनही दिलय.
ICC Test Ranking: स्मिथला मागे टाकत कोहली पुन्हा अव्वलस्थानी
माही सर्व गुण संपन्न आहे पण हा व्हिडिओ स्वत:च्या जबाबदारीवर पाहा. व्हिडिओ शेअर केल्यामुळे मला मारु नकोस माही, असा उल्लेखही प्रितीने पोस्टमध्ये केलाय. या व्हिडिओमध्ये धोनी 'जब कोई बात बिगड़ जाए' या गाण्यातील 'वफादारी की वो कसमें...' या ओळी गायला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा मोनू सिंह देखील धोनीसोबत दिसत आहे.