पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिले धोनीच्या निवृत्तीचे संकेत

महेंद्रसिंह धोनी

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषकातील भारताच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी निवृती घेणार असल्याची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीनंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.

पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने धोनी अचानकपणे निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, धोनी कधी कोणता निर्णय घेईल सांगता येत नाही. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील कर्णधारपद अचानकपणे सोडले होते. त्याप्रमाणेच तो निवृत्तीचा निर्णयही अचानक घेऊ शकतो, असे म्हटले आहे.  

नाराजीचा शेवट थेट निवृत्तीनं, रायडूचा क्रिकेटला 'रामराम'

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. यासाठी संघ निवडीच्या प्रक्रियेसाठी निवड समिती ऑक्टोबरपर्यंत विविध खेळाडूंची चाचपणी करणार आहे. यापूर्वीच धोनी निवृत्ती घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यंदाच्या विश्वचषकात अफगाणिस्तान, वेस्टइंडिज आणि बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील खेळीनंतर धोनीवर धीम्या खेळीमुळे टीका झाली होती. यावेळी सध्याचा कर्णधार विराट कोहलीसह माजी कर्णधार सौरव गांगुलीने धोनीची पाठराखण केली होती. 

अखेर धोनीच्या खेळीनं सचिनला प्रभावित केलं

भारतीय संघाने विश्वचषकातील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीतील सामना जिंकून भारताने जर अंतिम फेरी गाठली. तर क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉर्डसच्या मैदानात भारतीय संघ विश्वचषकातील अखेरचा सामना खेळेल. या मैदानातून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करेल का? हा पाहणे महत्त्वाचे ठरेल.