पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लष्कराची ड्युटी संपवून धोनी परतला; पत्नी आणि मुलीने केले स्वागत

महेंद्र सिंह धोनी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी भारतीय लष्करामध्ये सेवा दिल्यानंतर घरी परतला आहे. रविवारी रात्री दिल्ली विमानतळावर त्याचे आगमन झाले. यावेळी पत्नी साक्षी आणि मुलगी जिवाने त्याचे स्वागत केले. तसंच धोनीच्या चाहत्यांनी देखील त्याच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर मोठी गर्दी केली होती. धोनीने जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात १५ दिवस भारतीय लष्करासोबत काम केले.

J&K मधील ११ दिवसांच्या मुक्कामानंतर डोवाल यांनी घेतली 

३८ वर्षाच्या महेंद्रसिंह धोनीने वेस्टइंडीज दौऱ्याला न जाता दोन महिन्याचा ब्रेक घेतला होता. याच दरम्यान धोनी भारतीय लष्करातील १०६ टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये सहभागी झाला. विक्टर फोर्सचा सदस्य म्हणून धोनीला काश्मीरच्या खोऱ्यात तैनात करण्यात आले होते. यावेळी त्याने टेरिटोरियल बटालियनसोबत काश्मीर खोऱ्यात ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत पेट्रोलिंग आणि गार्डची ड्युटीचे काम केले. धोनीला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नलचा किताब देण्यात आला आहे. 

सेहवागच्या फोटोवरुन नेटकऱ्यांनी साधला पाकवर निशाणा

दरम्यान, महेंद्रसिंह धोनी फॅन्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर धोनी लष्कराची ड्युटी पूर्ण करुन परत आल्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिवशी धोनी लेह, लडाखमध्ये होता. यावेळी धोनी लहान मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसला होता. तो फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

वडिलांच्या मर्जीविरोधात लग्न करणारी साक्षी मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत