पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दोन दिवसांत धोनीच्या भविष्याचा कल समजणार

महेंद्रसिंह धोनी

विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलमधील पराभवानंतर सर्वांच्या नजरा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर आहेत. विश्वचषकातील अंतिम सामन्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र, सेमीफायनलमधील पराभवानंतर धोनी विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा फोल ठरल्या. त्यानंतर आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी महेंद्रसिंह धोनीला संघात स्थान मिळणार का? याकडे त्याच्या चाहत्यांसह टिकाकारांचे लक्ष लागून आहे. 

 

INDvsWI: ३ ऑगस्टपासून भारताचा विंडीज दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

१९ जूलै रोजी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवडीसंदर्भात निवड समिती काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरले. धोनीने भविष्यातील आपल्या निर्णयासंदर्भात निवड समिती किंवा बीसीसीआयशी कोणतीही चर्चा केलेली नाही.  

प्रसारमाध्यमातील काही वृत्तानुसार, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यासाठी सध्याच्या घडीला धोनी ही पहिली पंसती नसल्याचे समोर येत आहे. या परिस्थितीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघासोबत त्याला संधी मिळण्याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यापूर्वी देखील एमकेप्रसाद यांनी धोनीबाबत नकारात्म असल्याचे बोलून दाखवले होते. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील धोनीच्या कामगिरीनंतर त्यांनी आपली भूमिका बदलली होती. त्यामुळे विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीनंतर निवडसमिती संघ निवडीदरम्यान कोणता फॉर्म्युला वापरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

IND vs WI: विंडीज दौऱ्यावर 'या' नव्या चेहऱ्यांना मिळेल संधी