टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विंडीज दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. धोनी हा प्रादेशिक सेनेच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल आहे. आगामी दोन महिने तो आपल्या रेजिमेंटबरोबर व्यतीत करणार असल्याचे समजते. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे.
धोनीची जागा कोण घेईल?, गौतम गंभीरने सांगितली तिघांची नावे
धोनीने विंडीज दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्या भविष्यावरुन पुन्हा एकदा प्रश्न उपस्थितीत होण्यास सुरुवात झाली आहे.
बीसीसीआयच्या एक अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, धोनीने स्वतः पुढील दोन महिने पॅराशूट रेजिमेंटबरोबर २ महिने व्यतीत करायचे असल्याचे सांगत विंडीज दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले.
'तुझी खूप आठवण येते' मोहम्मद शमीचे भावूक ट्विट
३८ वर्षीय धोनीने बीसीसीआयला आपला हा निर्णय कळवला आहे. रविवारी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची मुंबईत बैठक आहे. त्यात विंडीज दौऱ्यासाठी संघ निवड केली जाणार आहे.
धोनीने माघार घेतल्यामुळे विंडीज दौऱ्यावर विकेटकिपर म्हणून ऋषभ पंत पहिली पसंती असल्याचे सांगण्यात येते. तर वृद्धिमान साहा याला दुसरी पसंती मिळण्याची शक्यता आहे.