पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्लॉग: फिलिंग धोनी तेव्हाच आउट झालाय, जेव्हा तो धावबाद झाला!

महेंद्रसिंह धोनी

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर सुमडीत रिटायर होण्याची वेळ येऊ नये, अशीच भावना धोनीच्या तमाम चाहत्याप्रमाणे माझीही आहे. धोनीच्या पुनरागमनाची चर्चा रंगते तेव्हा मी मौन बाळगण पंसत करतो. स्वत: धोनी खेळणार किंवा निवृत्त होणार यावर काहीच प्रतिक्रिया देत नसेल तर आपण बोलून काय उपयोग यातूनच मौनवृत्ती धारण केली होती. बीसीसीआयच्या करारानंतर हे मौन तोडून थोडी फटकेबाजी करावीशी वाटते. इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकापूर्वीपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. विश्वचषकानंतर तो निवृत्ती घेणार असे बोलले गेले. पण विश्वचषक संपता संपता चर्चा रंगली ते त्याच्या धावबाद होण्याची. न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनलमधील सामन्यात धोनी धावबाद झाला नसता तर आम्ही मॅच काढली असती, असा विचार क्रिकेट चाहत्यांच्या मनात मॅच संपल्यावरही आला होता आजही येतो आणि उद्याही येईल.

BCCI च्या करारातून धोनी आउट! कोहली, रोहित अन् बुमराह A+ श्रेणीत

....पण धोनीची त्या वनडेमधील ती अधूरी धाव शेवटची ठरेल असा विचार कदापी कोणाच्या डोक्यात आला नव्हता. तमाम क्रिकेट चाहत्यांच्या स्वप्नाचा भ्रमनिरास करणारी ती धावच धोनीची अखेरची ठरेल, अशी परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. जोपर्यंत धोनी पुन्हा मैदानात उतरत नाही तोपर्यंत टीम इंडियात त्याला स्थान मिळणार की नाही हे सांगता येणार नाही, असे सांगत बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी चेंडू धोनीच्या कोर्टात फेकला. धोनीने तब्बल सहा महिन्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धावबाद झाल्याची खंत उघडपणे बोलून दाखवली. मात्र क्रिकेटच्या मैदानात उतरणार की नाही याबाबतची मनातील घालमेल त्याने सोयीस्करित्या अनुत्तरित ठेवली.

बीसीसीआय 'राजी' नसल्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाला मोठा दणका बसणार

दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी कसोटीनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेईल आणि टी-२० सामने खेळत राहिल अशी प्रतिक्रिया देत आगामी विश्वचषकात धोनीसाठी दरवाजे खुले आहेत, याचे संकेत दिले. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर टी-२० त पुनरागमन करणे धोनीसाठी अवघड नाही, या विचाराने चाहत्यांनाही थोडा दिलासा मिळाला. पण बीसीसीआयने नुकत्याच जारी केलेलेल्या खेळाडूंच्या करारातून धोनीचे नाव गायब असल्यामुळे धोनीच्या भविष्य अदांतरी नव्हे तर आंधारत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हा करारनामा धोनीच्या कारकिर्दीला पूर्णविराम देणारा आहे, अशीच शंका निर्माण होत आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही म्हणाल पोरानं धोनीची डिक्टो कॉपी केली

सध्याच्या घडीला ऋषभ पंत म्हणावी तशी कामगिरी करत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाल्यानंतर लोकेश राहुलने यष्टिमागची जबाबदारी पेलल्याचे पाहायला मिळाले. संजू सॅमसनसारखी दुसरी मंडळीही या लाईनीत आहेत. मध्यंतरी राहुल द्रविडनं जी भूमिका बराचकाळ निभावली तसा प्रयोग करुन पंत लोकेश राहुल यांच्यात मेळ घालण्याचा प्रकार पाहायला मिळाला तर नवल वाटणार नाही. अर्थात धोनी भारी होता.. आहे अन् राहिल पण तो संघात येईल का? यावर छातीठोकपणे काही सांगता येणार नाही. धोनीसारख्या महान खेळाडूने मैदानातूनच निवृत्ती घ्यावी, असे वाटत असले तरी त्याला काय वाटते हे कळायला मार्ग नाही. त्यामागे काही कारणही असू शकतात.

धोनीच्या 'कमबॅक' संभ्रमावर गावसकरांचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'

धोनीच्या काळात राहुल द्रविड, व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण, धडाकेबाज विरेंद्र सेहवाग, २०११ च्या विश्वचषकात ९७ धावांची खेळी करुन जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा गौतम गंभीर यांना निवृत्तीचा सचिनसारखा समारोह वाट्याला आला नाही. धोनीही या खेळा़डूंच्या पक्तींत येणार असे चित्र सध्याची परिस्थिती सांगते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे हे चक्र फिरूही शकते. पण ते फारच कठीण आहे.

-सुशांत जाधव

Email -Sushantjournalist23@gmail.com

Twitter- @2010Sushj

Mob-9762054777

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ms dhoni not in BCCI annual player contracts it be signal of retirement read Special Blog Written By Sushant Jahdv