पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

T-20 : आफ्रिकेविरुद्ध धोनीला संघात स्थान मिळणे 'मुश्किल'

धोनी आणि पंत

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत चांगलीच चर्चा विश्वचषकानंतर रंगली. विंडीज विरुद्धच्या दौऱ्यातून त्याने माघार घेतली त्यावेळी सध्याच्या घडीला तो निवृत्तीचा कोणताही विचार करत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता धोनी संघात कधी दिसणार याची त्याचा चाहतावर्ग वाट पाहत आहे.

'हा' खेळाडू वयाच्या ८५ व्या वर्षी क्रिकेटला अलविदा करणार

मात्र, आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात देखील धोनीला संघाबाहेर बसावे लागण्याचे संकेत दिसत आहे. 
१५ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी धोनीला संघात स्थान मिळणे कठीण आहे. भारत दौऱ्यावर येणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ४ सप्टेंबरला भारतीय संघाची निवड होणार आहे.  

National Sports Day 2019: पुनिया, दीपासह या खेळाडूंचा होणार सन्मान

या मालिकेतील पहिला सामना १५ सप्टेंबरला धर्मशाला मैदानात रंगणार असून दुसरा सामना १८ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानात खेळवण्यात येणार असून २२ सप्टेंबरला बंगळुरुच्या मैदानात या टी-२० मालिकेची सांगता होणार आहे. आगामी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघाची निवड करण्यात येणार असल्यामुळ धोनी ऐवजी ऋषभ पंतलाच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.