पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

MSD च्या भविष्यावर 'जम्बो' रिअ‍ॅक्शन

महेंद्रसिंह धोनी आणि अनिल कुंबळे

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी इंग्लंडमधील विश्वचषकापासून क्रिकेटच्या मैदानातून दूर आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला मायदेशात होणाऱ्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या मालिकेसाठी देखील त्याच्या नावाचा विचार झाला नाही. त्यामुळे धोनीच्या भविष्याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहे. नव्या वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत धोनीला संधी मिळणार का? असा प्रश्न धोनीच्या चाहत्यांसह क्रिकेट जाणकारांना सतावत आहे. 

रवी शास्त्रीचा शाहरुख-रविनासोबत नवीन वर्षाचा जल्लोष

विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच धोनी निवृती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र बीसीसीआयने हे वृत्त फेटाळून लावले होते. धोनी योग्यवेळी योग्य तो निर्णय घेईल, अशीच बीसीसीआयची भूमिका आहे. त्याला मैदानात पुन्हा उतरायचे असेल तर त्याने पुन्हा खेळायला सुरुवात करायला हवी, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिली होती. त्यानंतर आता भारताचे माजी प्रशिक्षक अनिक कुंबळे यांनी धोनीच्या भविष्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.  

Wisdens T20i Decade: भारताचे दोन मोहरे संघात, पाकच्या एकाला स्थान नाही

धोनीचे पुनरागमन हे आयपीएलच्या कामगिरीवर अवलंबून असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयपीएलमधील त्याची कामगिरी पाहून बीसीसीआय आगामी विश्वचषकात संधी द्यावी का? यावर विचार करु शकते. यासाठी आपल्याला आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागेल. आगामी विश्वचषकात लोकेश राहुल याला राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान मिळू शकते, असे विधान भारताचे विद्यमान प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी केले होते. यावरही कुंबळेंनी भाष्य केले.

भारत दौऱ्यासाठी ऑसी संघात बदल, या शिलेदारांना आव्हान पेलणार का?

टी-२० मध्ये फलंदाजीसह यष्टिमागे चांगली कामगिरी करण्याची लोकेश राहुलमध्ये क्षमता आहे. कर्नाटक संघाकडून त्याने यष्टिमागे उत्तम कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे हा प्रयोग पाहायला मिळाला तर नवल वाटणार नाही, असे कुंबळे यांनी म्हटले आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पर्यायी प्रयोगाचा विचार करत असताना १०-१२ सामन्याच्या संदर्भात विचार करावा, असा सल्लाही त्यांनी बीसीसीआय निवड समितीला दिला आहे.